‘बिग बॉस’ मराठी मधील स्पर्धक अभिजीत बिचुकले म्हणतो, ‘मला झालेली अटक राजकीय कट-कारस्थानाचा भाग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मला झालेली अटक हा राजकीय कट-कारस्थानाचा भाग आहे असा आरोप बिग बॉस मराठी 2 चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याने केला आहे. अभिजीत हा बिग बॉसच्या घरातील एक गाजलेला स्पर्धक आहे. अभिजीतला चेक बाउन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक राजकीय कट असल्याचं अभिजीत म्हणतो आहे. नुकतंच मराठी बिग बॉसचं दुसरं पर्व सुरु झालं आहे. या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरु असताना दिसत आहे. अशातच अभिजीतला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अटक केल्यानंतर अभिजीत बिुचकलेची पहिली प्रतिक्रिया-

गोरेगाव फिल्मसिटीतील बिग बॉसच्या घरातून पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला अटक केली आहे. छातीत दुखत असल्याकारणाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत बिचुकलेची आज साताऱ्यातील कोर्टात हजेरी होती. परंतु त्याआधीच तो रुग्णालयात भरती झाला आहे. यादरम्यान अभिजीतने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर अभिजीत बिचुकलेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना अभिजीत म्हणाला की, “माझ्याविरोधात तक्रार दाखल करणारे संदीप संपकाळ यांच्याघरी गेल्या 12 वर्षांपासून माझं कुटुंब रहात आहे. आम्ही त्यांना नियमितपणे पैसे देत आलो आहोत. आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत. परंतु अचानक त्यांनी इतकी जुनी केस उकरून काढली आहे. त्यांनी असं का केलं हे मला समजत नाही. माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करणं हा राजकीय कट आहे. संदीपला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं आहे. राजकीय स्वार्थासाठी हे केलं जात आहे. मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी निवडणूक लढवू नये असं वाटणाऱ्यांनीच हे कृत्य केलं आहे.”

नेमकं प्रकरण काय ?

बिग बॉस मराठी 2 या रिअॅलिटी शोचा स्पर्धक असणारा अभिजीत बिचुकलेवर चेक बाउन्सप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरु आहे. सुनावणीला गैरहजर असल्याने न्यायालयाने अभिजीत बिचुकलेला अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर सातारा पोलिसांनी गोरेगाव फिल्मसिटीतील बिग बॉसच्या घरातून अभिजीतला ताब्यात घेतले.

आरोग्यविषयक वृत्त-

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

 

सिने जगत-

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा