पत्नी जास्मिनसोबतच्या मतभेदावर अभिनेता पुष्कर जोगचा ‘मोठा’ खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’चा स्पर्धक पुष्कर जोगची पत्नी जास्मिनने आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवरुन पुष्कर आणि तिचे सगळे फोटो डिलीट केल्याचे समजले आहे. एवढे काय झाले असेल की, डायरेक्ट आपल्या पतीचे फोटो तिने डिलीट केले असावे ? याची चर्चा सर्वत्र पसरत आहे. सगळे चाहते आश्चर्यचकित झाले आहे. सगळ्यांमध्ये चिंताजनक वातावरण झाले आहे.

प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोगची सध्या खूपच चर्चा होत आहे. त्याच्या वयक्तित आयुष्याबद्दल कळताच सोशल मिडियाला एक चर्चेचा विषय मिळाला आहे. पुष्कर आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये खूप वादावाद झाल्याचे कळत आहे. पण यामध्ये काहीच सत्य नाही, अशी प्रतिक्रिया पुष्कर जोगने दिली आहे.

नुकताच १५ जुलैला अभिनेता पुष्कर जोगने आपला वाढदिवस साजरा केला. याच्या बर्थडे पार्टीमध्ये त्याची पत्नी जास्मिन दिसली नाही. ती पार्टीमध्ये दिसली नाही म्हणून सगळीकडे चर्चा सुरु झाली. कदाचित यांच्या नात्यामध्ये मतभेद झाले असावे, असा अंदाज लावला जात आहे. यांच्या मतभेदाचे कारण म्हणजे ‘बिग बॉस मराठी’मधील सहस्पर्धक सई लोकूर हीच्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचा अंदाज लावला जात आहे.

त्यामुळे कदाचित तिने आपले आणि पुष्करचे फाटो सोशल मिडियावरुन डिलीट केले आहे. एवढेच केले नसून त्या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो देखील केल्याचे समजले आहे. सई आणि पुष्कर एकमेकांच्या जवळ आल्यामुळे यादोघांच्या नात्यामध्ये फुट पडली आहे, असा दावा काही लोकांनी ट्विटरद्वारे केला होता.

https://twitter.com/OfficeVGM/status/1150750750466662401

‘फादर्स डे’ दिवशी जास्मिनने मुलगी फेलिशासोबत एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता त्या फोटोला तिने कॅप्शन दिले होते की, ‘जेव्हा तुम्ही पालक होता. तेव्हा तुम्हाला दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात.’ पुष्कर जोगबद्दल जास्मिन म्हणाली की, ‘सोशल मिडियावर एकमेकांना फॉलो करणे गरजेचे नाही. मी वर्किंग वुमन आहे. त्यामुळे मी स्वतंत्र आणि खंबीर आहे. म्हणून मी #motherasfather हा हॅशटॅग वापरला आहे. असे उत्तर तिने एका वृत्तंस्थंस्थेला दिले. त्याचबरोबर तिने आमच्या नात्याविषयी पुष्कर नीट सांगेल हे देखील म्हणाली.’

पुष्करने एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली की, ‘आमच्या नात्याविषयी भाष्य करणारे ट्विट्स हे माझी प्रतिमा कमी करण्यासाठी करत आहे. सोशल मिडियावर असे काही लिहण्यासाठी ट्रोलर्सला पैसे कोण पुरविते का कोणास ठाऊक, हे सगळे खोटे आहे.’

पुष्करने पुढे सांगितले की, ‘माझी बायको, मुलगी आणि आईसोबत माझे कसे नाते आहे, याचे उत्तर देण्यासाठी मी कोणाचा बांधिल नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याचे थोडे भान राखा आणि माझ्या कुटुंबाला कशातही घेऊ नका. माझ्या कुटुंबाला मिडियापासून दूर रहायचे आहे.’

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर विजेती मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर यांची मैत्रीची चांगलीच चर्चा होती. त्यामध्ये सई आणि पुष्करची चर्चा जास्त रंगली. सईड्या आणि पुष्की यांची अशी टोपणनावे ऐकताच सगळ्यांना भुवया उंचावल्या होत्या.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like