Bigg Boss Marathi | ‘बिग बॉस’मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी, नव्या वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा चर्चेत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. बिग बॉसमध्ये (Bigg Boss Marathi) बोलावलं तर नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये (Bigg Boss Marathi) जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील यांना बिग बॉस मध्ये (Bigg Boss Marathi) जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकात, गाण्यांमध्ये भाग घ्यायचो. आता बिग बॉस मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी आहे. मिळाली तर निश्चितपणे जावू, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले.

नुकतेच महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) असा प्रश्न करण्यात आला होता, की राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉस मराठीच्या खेळात तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचंही नाव घेतलं होतं. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) बिग बॉसमध्ये यायला पाहिजेत, मजा येईल, ते कडक बोलतात, असं देखील मांजरेकर यांनी म्हटले होते.

यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे.
तसेच भाजप आमदार नितेश राणेंना (BJP MLA Nitesh Rane) बघायला आवडेल, ते एक मजा वेगळी आणतील.
तसेच शिवसेना खासदार संजय राऊतही आवडले असते. ते वेगळा रंग आणतात, असंही महेश मांजरेकर म्हणाले होते.

Web Title :- Bigg Boss Marathi | gulabrao patil said he will happily join big boss show if they sent offer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…’, नाना पटोलेंच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर म्हणाले- ‘या संघाच्या शाखेत’

Shivsena | शिवसेनेकडून अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर प्रश्नांचा भडीमार! प्रकल्प गेल्याचे दुःखही महाराष्ट्राने व्यक्त करू नये का?