Bigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Bigg Boss Marathi | कोरोनाच्या महामारीमुळे 2020 मधील ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) तिसरा सीझन थांबला होता. आता कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात आल्याने प्रेक्षक आणि चाहत्यांच्या भेटीसाठी तिसरा सीझन लवकरच येणार आहे. याबाबत सोशल मिडियावर याची चर्चा देखील तेवढीच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमुळे शोच्या चाहत्यांमध्ये आता उत्सुकता निर्माण झालीय.

‘बिग बॉस मराठी’च्या तिस-या पर्वात अनेक नावांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रथम आणि द्वितीय सिझनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्रींनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला होता. म्हणून या तिस-या पर्वात कोणती ज्येष्ठ अभिनेत्री बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन आहे. मराठमोळी दिग्गज अभिनेत्रीचं नाव सध्या चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये (Alka Kubal-Athalye) बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, याबाबत कुठलीही सविस्तर माहिती समोर आली नाही.

दरम्यान, पहिल्या सिझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात ज्येष्ठ स्पर्धकाचा मान उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांना मिळाला होता. बिग बॉसच्या घरातील हा एक विक्रमच आहे. त्याचबरोबर दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांना मान मिळाला होता. या दरम्यान, यंदा तिस-या सिझनमध्ये एन्ट्री करण्याआगोदर प्रत्येक स्पर्धकाला काही दिवस क्वारंटाईन (Quarantine) व्हावे लागणार आहे. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर मगच बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळणार आहे.

 

Web Title : Bigg Boss Marathi | popular actresses alka kubal expected to enter the bigg boss marathi season 3 house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sleeping Tips | झोपेसंबंधी ‘या’ 5 चुकांमुळे येतंय अकाली वृद्धत्व, तरूण दिसण्यासाठी करा ‘ही’ सुधारणा; जाणून घ्या

Papaya Seeds | पोटातील जंत मारण्यासाठी पपईच्या बिया खाताहेत लोक, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा; जाणून घ्या

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या