‘बिग बॉस’च घर आता मराठमोळं

मुंबई : वृत्तसंस्था – ‘बिग बॉस मराठी’च दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वामध्ये शोची जितकी चर्चा झाली तितकेच कौतुक झाले ते ‘बिग बॉस’च्या सेटचे. मात्र ह्या वेळेस बिग बॉसच घर बदललं आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये ‘बिग बॉस’चा सेट उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी बिग बॉसच्या घराला भव्य दिव्य वाड्याचं स्वरुप देण्यात आलं आहे.

असा आहे बिग बॉसच सेट –

गोरेगावच्या फिल्मसिटीत १४ हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये सेट तयार केला आहे. या घराला आलीशान मराठमोळ्या वाडय़ाचे स्वरूप देण्यात आले आहे. यात मध्यभागी मोठे अंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील.

या कारणामुळे बदलली जागा-

हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉसचा सेट देखील लोणावळ्यात उभा करण्यात आला होता. मात्र, काही दिवसात सुरू होणाऱ्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण मात्र मुंबईत होणार अ आहे. याआधी मल्याळम ‘बिग बॉस’चे चित्रीकरण फिल्म सिटीमध्ये झाले होते. मुंबईत चित्रीकरण करणे शोच्या दृष्टीनं सोयीचं पडणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

दुसऱ्या सीजनमध्ये १५ सेलिब्रेटी १०० दिवस एकत्र राहणार असून त्यांच्यावर ७५ कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे.