Bigg Boss OTT | बिगबॉसमध्ये स्पर्धकाला पाजले साबणाचे पाणी; जिया शंकरला घरातून बाहेर काढण्याची होत आहे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस (Big Boss) आणि वादविवाद, भांडणं व काँट्रॅव्हर्सी हे तर एक समीकरण बनले आहे. बिग बॉस हिंदी असो वा बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) अनेक स्पर्धकांमध्ये टोकाची भांडणं व जीवघेणी स्ट्रॅटेजी बघायला मिळत असते. सध्या बिग बॉस ओटीटी सीजन 2 (Bigg Boss OTT Season 2) सुरु आहे. हे सीजन चांगलेच गाजते (Bigg Boss OTT) आहे. नवनवीन गोष्टी प्रेक्षकांना स्पर्धकांकडून ऐकायला मिळत आहे. अशामध्ये आता स्पर्धेक जिया शंकर (Jiya Shankar) ही ट्रेन्डिंगवर असून जीयाला ट्रोल केले जात आहे. तिने एल्विशला (Elvish Yadav) साबणाचे पाणी प्यायला दिल्याने प्रेक्षक तिच्यावर रोष व्यक्त करत आहेत.

बिग बॉस ओटीटी मध्ये प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादव याने एंट्री (Elvish Yadav In BB House) केली आहे.
त्याला आल्यापासून अनेक स्पर्धेकांशी पंगा घेतला असून जिया व त्य़ाचे देखील भांडण झाले आहे. मात्र जियाने एल्विशला (Jiya VS Elvish) पिण्याच्या पाण्यामध्ये हॅंडवॉश घालून दिला. यावरुन जियाला ट्रोल (Jiya Shankar Troll) केले जात आहे. तिच्या या भयानक कृतीवरुन घरातील लोकांनी देखील तिला सुनावले आहे. एल्विशला आधी याबद्दल माहित नव्हते पण जेव्हा त्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने पाणी फेकून दिले व जियाला चांगलेच सुनावले. एव्लिश रागात म्हणाला की, “आपल्या येथे दुसऱ्याला पाणी देणे हे पुण्याचे मानले जाते. तुझ्या घरात खायचे प्यायचे काही दिसत नाही. तुम्ही तुमच्या घरात साबण असलेले पाणी पीत असाल. थोडी तरी लाज बाळग.” अशा शब्दात त्याने जियाला खडे बोल सुनावले. जियाच्या या वागणुकीवर घरातील इतर सदस्यांनी देखील एल्विशची बाजू घेतली. पूजा भट्ट (Pooja Bhatt), फलक (Falaq Naaz) व बेबिका (Bebika Dhurve) यांनी देखील जियाला ती चूकीची आहे हे सांगतिले. यावर उत्तर देत जियाने सांगतिले की तिला वाटले नव्हते एल्विश ते पाणी पिणार आहे.

सध्या सोशल मीडियावर जिया शंकरला तिच्या या कृतीमुळे खूप ट्रोल केले जात आहे.
अनेकांनी तिचे हे वागणे जीवघेणे असल्याचे बोलले आहे.
या घटनेनंतरही जिया हसून खेळून घरात वावरत असल्याचे पाहून प्रेक्षकांच्या पारा अजून चढला आहे.
सोशल मीडियावर जियाला घरातून (Bigg Boss OTT) बाहेर काढण्याची मागणी केली जात असून #shameonjiya हे हॅशटॅग ट्रेंड
मध्ये आहे. यावर लोक भडकलेले दिसत असले तरी बिग बॉसमध्ये अशा प्रकारच्या प्रसंगाची ही काही पहिली वेळ नाही.
जिया शंकरच्या या वागणूकीवर सलमान खान (Salman Khan) ‘विकएंट का वार’ (Weekend Ka War) मध्ये जियाला काय
सुनावतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title :  Bigg Boss OTT | bigg boss ott jiya shankar gives soap water to elvish yadav to drink netizens slam actress heavily troll past controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Train Cancel | मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले- ‘सत्तेची साठमारी…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक

Pune Police News | CP रितेश कुमार, Jt CP संदीप कर्णिक यांचा ‘ऑल आऊट’वर भर ! ‘कोम्बिंग’मध्ये 1727 गुन्हेगार ‘घेरले’; कोथरूडमध्ये 2 मोस्ट वॉन्टेड ‘हेरले’ (Video)