Bigg Boss : आकांक्षा पुरीला भेटणार पारस छाबडा, म्हणाला – ‘ब्रेकअप करणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 13 मधून फिनालेच्या आधी बाहेर पडलेला पारस छाबडा आता आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाला आहे. कलर्सवरील मुझसे शादी करोगे या शोमध्ये तो काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत बिग बॉसची याच सीजनमधील स्पर्धक शहनाज गिल हीदेखील असणार आहे. पारस छाबडा सुरुवातीपासूनच बिग बॉसचा विनर असल्याचा दावा करत होता परंतु प्रत्यक्षात मात्र सिद्धार्थ शुक्लानं बाजी मारली आहे.

https://www.instagram.com/tv/B8jXDWAhNAe/?utm_source=ig_embed

पारस घरात असताना जेवढा चर्चेत होता त्यापेक्षाही तो घराच्या बाहेर असताना चर्चेत राहिला. पारसच्या खासगी आयुष्याबद्दल सलमान खाननं वीकेंड वॉरमध्ये खुलून भाष्य केलं. सलमानं सांगितलं होतं की, पारसचा सगळा खर्च त्याची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी उचलते. यामुळे पारस खूपच नाराज झाला होता.

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर पारस म्हणाला, “मला नाही माहीत की आकांक्षानं पर्सनल डिटेल्स पब्लिक का केले. जर तिचं माझ्यावर प्रेम आहे तर तिनं हे सगळं सर्वांना खास करून मीडियाला का सांगितलं. मला सलमान सर ओरडले. तेही तिच्यामुळे. यानंतर आता आमचं काहीच फ्युचर नाही. मी आकांक्षाला नक्कीच भेटेल. मी तिला मुव्ह करण्यासाठी सांगणार आहे.” असं त्यानं सांगितलं.

https://www.instagram.com/p/Bz7Zx_0loYi/

सलमान खानबद्दल पारस म्हणाला, “सलमान खान माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मला वाटतं मला त्यांना ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्या ओरडण्याला सकारात्मक घेतलं आहे.”

https://www.instagram.com/p/BzxkXSnFXX0/

https://www.instagram.com/p/BzFLKgFlTK6/