Coronavirus Impact : ‘या’ क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका, जाणून घ्या

पुणे, पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असताना अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. अनेक क्षेत्रांना लॉकडाऊनचा जबर फटका बसला आहे .देशातील आठ महानगरांमधील साडेसहा लाख तयार घरे विक्रीविना पडून आहेत. देशातील ८ महानगरांत १५ लाख घरांचे बांधकाम प्रकल्प सुरू झालेत. मालमत्ता क्षेत्रातील `99 एकर` या संकेतस्थळाने याविषयी एक सर्वेक्षण केले. जाणून घेऊयात नेमकी परिस्थिती काय आहे ते.

१-लॉकडाऊनमुळे घराचा ताबा मिळण्यास उशीर होत आहे

२-तसेच थेट वाटाघाटी करण्यास अडचणी येत आहेत
३-अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे पैसे फेडण्याच्या क्षमतेत घट होताना दिसत आहे

४- ओढवलेल्या परिस्थितीमुळे अनेक ऑफर्स देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

विकासक ( बिल्डर )

लॉकडाऊनमुळे अनेक प्रकल्प हे थंडावले आहेत. लॉकडाऊन च्या परिस्थितीत खरेदीमध्ये घट झाल्यास विकासकांची आर्थिक स्थिती बिकट होणार आहे हि नवे प्रकल्प आणि फेस्टिवल ऑफर 6 ते 9 महिन्यांसाठी पुढे ढकलावे लागणार प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी विकासकांकडून करण्यात येत आहे.

मालमत्ता एजंट-लॉकडाऊनचा या व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे.
नेटवर्किंगसाठी या व्यवसायाला आता डिजिटल प्लॅटफॉर्मची आवश्यकता भासणार आहे

-आठ महानगरांमध्ये जवळपास साडेसहा लाख घरे विक्रीविना पडून आहेत. घरे विकण्यासाठी फेस्टिवल काळही निघून गेला आहे. तर १५ लाख घरांचे प्रकल्प पुढे ढकलावे लागणार आहेत.

लीजवर मालमत्ता खरेदीवर वाढ – सहा महानगरामध्ये कार्यालयांसाठी जागा लिजवर खरेदी घेणाऱ्यांच्या संख्येत २७ टक्के वाढ झाली आहे. लीज म्हणजेच भाडेतत्वात्वावर जागा घेणे

बंगळुरु, मुंबई, हैदराबाद या महानगरात ७५ टक्के कार्यालये लिजवर आहेत.

घरांच्या किमती कोसळणार – प्रमुख शहरामध्ये घराच्या किमती कमी झाल्या नाही; मात्र कोरोना संकटामुळे ग्राहकांची घर खरेदीची क्षमता कमी होणार असल्यामुळे स्वाभाविक घराच्या किमंती कमी कराव्या लागणार आहे.

भाडेतत्वावर घरांना मागणी- मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगळुरु या शहरात भाडेतत्वावरील घरांच्या मागणीत ३ ते ४ टक्के वाढ झाली आहे. मुंबई, दिल्लीसह इतर महानगरामध्ये मोठ्या प्रमाणात घरे तयार आहे. कोरोना संकटामुळे भाडेतत्वावर मालमत्ता घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे

परवडणाऱ्या घरांची मागणी कायम- परवडणाऱ्या घरांची मागणी कायम राहण्याचे संकेत आहेत.

अनेक प्रकल्प लांबणीवर – मार्चपर्यंत तयार घराची मागणी कायम होती; मात्र लॉकडाऊनच्या काळात उत्तर भारतामध्ये घरांसाठी चौकशीमध्ये २० टक्के, तर दक्षिण भारतात घरांच्या चौकशीमध्ये ते ७ ते ८ टक्क्यांनी कमी झाल्यात. या काळात सर्व गृहप्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यामुळे हे क्षेत्र संकटात आले आहे. देशातील १५ लाख घरांच बांधकाम सुरु होते. त्यापैकी एकट्या मुंबईत ५७ टक्के म्हणजे ८ लाख ९० हजार घरे आहेत. तर दिल्लीमध्ये ४ लाख २५ हजार घरांचे बांधकाम सुरु आहे. हे सर्व प्रकल्प आता लांबणीवर पडले आहेत.

लाख रुपये किंमतीच्या आत असलेली परवडणारी 6 लाख 24 हजार घरेसुद्धा अजून खपलेली नाही. 40 लाख ते 1 कोटी रुपये किमंतीची घरे मागणीच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहेत. तर आलीशान घरे मागणीपेक्षा अधिक उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या घऱांची मागणी जास्त आहे

अशाप्रकारे बांधकाम व्यवसाय आणि त्याला संलग्न असलेले छोटोमोठे व्यवसाय लॉकडाऊनमुळे  डबघाईला आले आहेत.