NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा ‘मासा’ ! ‘Pablo Of drug word’ नावाने प्रसिद्ध असलेल्या आरिफ भुजवालाला अटक

पोलिसनामा ऑनलाईन – रायगड येथून भुजवालाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एनसीबीने अटक केलेला आरिफ सर्वात मोठा ड्रग डीलर आहे. ड्रग्स प्रकरणी एनसीबीला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. आरिफ भुजवालाला अटक केली आहे. ‘Pablo of drug word’ नावाने तो प्रसिद्ध आहे. एनसीबीने केलेल्या या अटकेनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्सच्या धंद्याला खीळ बसली आहे.

आरिफ भुजवाला हा दाऊदचा भाऊ अनीश इब्राहिमचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. आरिफने ड्रग्सच्या माध्यमातून खूप पैसा कमावला. आरिफजवळ १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. या संपत्तीत महागड्या गाड्या, फ्लॅट्स आणि प्लॉट्सचा समावेश आहे. याआधी आरिफला अटक करण्यासाठी एनसीबीने त्याच्या लॅबवर छापेमारी केली होती, मात्र आरिफ तेथून फरार झाला होता. आता एनसीबीच्या जाळ्यात आरिफ आला असून त्याच्याकडील कोट्यावधी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा एनसीबीला सापडला आहे.

आरिफ हा चिंकू पठाणचा पार्टनर आहे. चिंकूला २० जानेवारीला घणसोली येथील एनसीबीने अटक केली. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आहे. तसेच चिंकू दाऊदचा जवळचा हस्तक असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ अलीकडेच दुबई येथे जाऊन आला आहे. त्याच्या दुबई ट्रिप देखील एनसीबीच्या रडारवर होती. आरिफ एक ड्रग लॅब चालवत होता. जेथे मेफेड्रोन, मेथमफेटामाईन आणि एफेड्रिन अशा सिंथेटिक ड्रग्स एका फ्लॅटमध्ये बनवले जात होते. हा फ्लॅट दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील नूर मंजिल इमारतीत होता. मागच्या बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीवरून एनसीबीच्या पथकाने गँगस्टर आणि ड्रग डीलर चिंकू पठाणला अटक केली. त्याचप्रमाणे एनसीबीने चिंकूचा साथीदार जाकिर हुसेन फजल हक शेखला देखील बेड्या ठोकल्या.