‘ड्रॅगन’ला घरातच धोका ! चीनमध्ये सर्वात मोठा घोटाळा, देशातील 83 टन सोनं निघालं बनावट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन आपल्या बनावट वस्तूंसाठी जगभरात ओळखला जातो. मग ते औद्योगिक उत्पादन असो किंवा बँकेचे कर्ज. ते बनावट आणि ज्या गोष्टी सध्या अस्तित्वात नाहीत अशा गोष्टी दाखवून गोंधळ घालतात, हे आता कळले आहे की चीनचा 4 टक्क्यांहून अधिक सोन्याचा साठा म्हणजेच 83 टन सोने बनावट आहे. एका मोठ्या चिनी ज्वेलरी कंपनीने ही गडबड केली आहे जिचे मुख्यालय वुहानमध्ये आहे.

एका वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार किंगोल्ड (Kingold) ज्वेलरी कंपनी वुहानमध्ये आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने 14 वित्तीय कंपन्यांकडून 2.8 बिलियन डॉलर म्हणजेच 21,148 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेण्यासाठी कंपनीने सुरक्षा म्हणून 83 टन बनावट सोन्याचे बार (सोन्याच्या विटा किंवा बिस्किट) ठेवले. अलीकडील इतिहासातील हा चीनमधील सर्वात मोठा सोन्याचा घोटाळा असल्याचे मानले जाते. या घोटाळ्यात पुन्हा वुहान शहराचे नाव आले आहे. जिथे सहा महिन्यांपूर्वी कोरोना विषाणू जगभर पसरला होता.

https://twitter.com/GCSGLLC/status/1277724690568695808

किंगोल्ड ज्वेलरी कंपनी नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. सोन्याची कामे करणारी ही जगातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. याची मार्केट कॅप 8 मिलियन डॉलर्स म्हणजेच 60.41 कोटी रुपये आहे. माजी सैन्य अधिकारी जिया झीहोंग या कंपनीचे मालक आहेत. एका अहवालानुसार किंगोल्ड ज्वेलरी कंपनीने 16 बिलियन युआन म्हणजेच 17,017 कोटी रुपयांच्या कर्जासाठी जामीन म्हणून सुरक्षा आणि विमासाठी 83 टन सोन्याच्या विटा-बिस्किट राखीव ठेवले होते. परंतु तपासणी दरम्यान ते तांब्याचे असल्याचे आढळले.

https://twitter.com/HARMONY77306078/status/1278170647076749312

आता हे कर्ज 30 बिलियन युआन म्हणजेच 32,073 कोटींच्या संपत्तीतून वसूल केले जाईल. ही वसुली चीनची विमा कंपनी पीआयसीसी प्रॉपर्टी आणि कॅज्युअल्टी कोऑपरेटिव्ह लिमिटेड करणार आहे. यासह काही अन्य छोट्या विमा कंपन्याही या कामात गुंतणार आहेत.

हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा यावर्षी फेब्रुवारीत किंगोल्ड कंपनीने डोंगगुआन ट्रस्टला लिमिटेडचे कर्ज दिले नाही. त्यानंतर कंपनीने किंगोल्डद्वारे सुरक्षा म्हणून सोन्याच्या विटा घेतल्या. त्याची तपासणी केली असता त्या तांब्याच्या असल्याचे आढळले. यानंतर किंगोल्डला कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर किंगोल्ड कंपनीला सर्वाधिक कर्ज देणारी कंपनी चायना मिनशेंग ट्रस्टने कोर्टाकडून आदेश जारी केला की जामीन म्हणून किंगोल्डने ठेवलेल्या सोन्याच्या विटाची चौकशी करण्यात यावी. 22 मे रोजी समजले की मिनशेंगजवळ ठेवलेल्या सोन्याच्या विटा तांब्याच्या आढळल्या.

किंगोल्डचे मालक जिया झीहोंग यांनी फ्रॉडचा आरोप फेटाळून लावला. झीहोंग म्हणाले की आम्ही कोठेही सोन्याचे बनावट बार ठेवले नाहीत. तसेच ते जामीन म्हणून वापरलेही नाही. किंगोल्ड कंपनीची स्थापना 2002 मध्ये झाली. तेव्हा ही कंपनी एक सोन्याचा कारखाना म्हणून ओळखली जायची. या कारखान्यास चीनच्या पीपल्स बँकने मान्यता दिली. नंतर ही कंपनी नॅस्डॅक स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. पण आता हा मुद्दा समोर आल्यानंतर या कंपनीचे नाव खराब झाले आहे.

संपूर्ण जगात अमेरिकेत सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. येथे 8134 टन सोने आहे. त्यापाठोपाठ जर्मनीत 3364 टन आणि इटलीत 2452 टन आहे. चीन 1948.30 टन सोन्याच्या राखीसह सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे. भारतात 642 टन सोने राखीव म्हणून आहे.