‘हा’ आजार ‘कोरोना’पेक्षाही धोकादायक, याच्यामुळं होतो दरवर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक असा आजार जो जगात वेगाने पसरत आहे, आणि जो कोरोना व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आणि घातक आहे. या आजाराने ग्रस्त रूग्णाला सतत हलका ताप, अस्वस्थता, खोकल्यासोबत असह्य वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजारसुद्धा गर्दीच्या ठिकाणी जास्त पसरतो. यामध्ये रूग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. यामुळे कोरोना व्हायरसपेक्षा जास्त लोक प्रत्येक वर्षी संपूर्ण जगात दगावतात. या आजारामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. या भयंकर संसर्गजन्य आजाराचे नाव आहे, ट्यूबर-क्यूलोसिस म्हणजे टीबी. हा एकमेव असा आजारा आहे, ज्याने संपूर्ण जगाचा कोणताही कोपरा सोडलेला नाही. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार जर हे वर्ष सोडले तर दरवर्षी जगात सर्वात जास्त मृत्यू टीबीमुळे होतात. यानंतर एचआयव्ही आणि मलेरियामुळे होतात. या वर्षी संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे अन्य आजारांकडे लोक लक्ष देऊ शकत नाहीत. परंतु, ते वाढत आहेत.

जर आणखी सहा महिन्यापर्यंत एचआयव्ही रूग्णांना अँटीव्हायरल थेरपी दिली गेली नाही तर 5 लाख लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतील. तर, डब्ल्यूएचओनुसार जगभरात मलेरियामुळे मरणार्‍यांची संख्या दुप्पट होऊन 7.70 लाख प्रति वर्ष होईल. पश्चिम अफ्रीकामध्ये मलेरियाचा सीझन सुरू झाला आहे. जगाच्या या भागात पूर्ण जगारातील मलेरियाने मरणार्‍यांपैकी 90 टक्के लोक असतात. लॉकडाऊन आणि मेडिकल फॅसिलिटी न मिळाल्याने पुढील दहा महिन्यात टीबीचे सुमारे 63 लाख प्रकरणे समोर येतील. 14 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता आहे. अन्य आजार वाढण्याचे कारण आहे कोरोना व्हायरस. त्याच्यामुळेच सर्व मेडिकल फॅसिलिटीज, डॉक्टर्स, नर्स, पॅरा-मेडिकल स्टाफ कोरोना ड्यूटीत व्यग्र आहे. यामुळे अन्य आजाराच्या रूग्णांना बरे करण्यास वेळ नाही. जर कोरोना व्हायरसमुळे अन्य आजारांकडे लक्ष दिले गेले नाही तर संपूर्ण जगाला सुमारे 214 लाख कोटींचे नुकसान होईल. ही एक खुप मोठी रक्कम आहे.

डब्ल्यूएचओ ग्लोबल मलेरिया प्रोग्रामचे संचालक डॉ. पेड्रो एल. अलोन्सो यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसने आम्हाला वैद्यकीय जगात 20 वर्षे मागे ढकलले आहे. केवळ कोरोना व्हायरसकडेच नव्हे, तर जगाला टीबी, मलेरिया आणि एचआयव्हीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. कोरोनामुळे अन्य आजारांच्या रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ज्यामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे जगभरात टीबी, एचआयव्ही आणि मलेरियाचे सुरू असलेले 80 टक्के उपक्रम बंद झाले आहेत किंवा थांबले आहेत. भारतात जगातील 27 टक्के टीबीचे रूग्ण आहेत. कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या डायग्नोसिसमध्ये 75 टक्केची कमतरता आली आहे. रशियामध्ये एचआयव्ही क्लिनिक कोरोनामुळे नव्या रूपात बदलण्यात आले आहेत. त्यांचा वापर कोरोना उपचारासाठी केला जात आहे.