१५ वर्षाच्या मुलाकडून राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी, वाचून थक्‍क व्हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका १५ वर्षाच्या मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून १५ वर्षीय कृष कुमार मित्रा याने राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. हा मुलगा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील आहे. या प्रकारानंतर पंतप्रधान कार्यालयाने तेथील जिल्हा प्रशासनाला तपासाचे आदेश दिले आहेत.

या १५ वर्षीय कृष मित्राने दोन महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादाला कंटाळून थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवले, या पत्रातून त्याने इच्छामरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतर या पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालयाला, बिहार मुख्यमंत्री आणि संबंधित अनेक अधिकाऱ्यांना पाठवली होती.

या कारणाने मागितले इच्छामरण

कृष कडून पाठवण्यात आलेेल्या पत्रात म्हणण्यात आले आहे की, आईचा सार्वजनिक ठिकाणी होणारा सततचा अपमान, सतत मिळणाऱ्या धमक्या यामुळे मी कंटाळलो आहे. मला जगायची इच्छा नाही, त्यामुळे मला इच्छामरणाची परवानगी द्यावी. हे पत्र पंतप्रधान कार्यालयाला मिळाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने तेथील जिल्हा प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

इच्छामरणाचा कायदा काय आहे

इच्छामरणाला भारतात कायदेशीर मान्यता नाही. जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका या देशात युथनेशियाला कायदेशीर मान्यता आहे. २०११ पासून भारतात इच्छामरणाचा प्रश्न तापला. केईएम मधील अत्यंत गाजलेले गंभीर प्रकरण म्हणजे अरुणा शानबाग या नर्सवर झालेले अत्याचार आणि त्यानंतर ती कोमात गेली होती. अनेक वर्ष अरुणा शानबाग अंथरुणाला खिळून होत्या. त्यानंतर हा प्रश्न देशात समोर आला होता.

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी