हेलिकॉप्टरचं Emergency Landing ! थोडक्यात बचावले अभिनेते आणि भाजप खा. मनोज तिवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरनं यशस्वीरित्या इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर (Helicopter Emergency Landing) धोका टळला आहे. मनोज तिवारी सध्या बिहार निवडणुकीत (Bihar Legislative Assembly election, 2020) भाजपच्या प्रचारात व्यस्त आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मनोज तिवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले असता ते एका अपघातातून थोडक्यात बचावले. हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं ते इमर्जन्सी लँड करावं लागलं.

खास बाब अशी की, काही दिवसांपूर्वीच त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गर्दीमुळं त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. सभांना होणारी गर्दी पाहता सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी अतिरीक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.

मनोज तिवारी सध्या बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये भाजपचे स्टार प्रचारक म्हणून जाबाबदारी सांभाळत आहेत.

You might also like