Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेना देखील उतरणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना प्रवक्त्ये खासदार संजय राऊत यांची मुंबईत येऊन भेट घेत त्यासंदर्भात चर्चा केली केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

बिहारमधील शिवसैनिक निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. बिहारमधील कमीत-कमी ५० जागा लढवण्याचा विचार आहे. म्हणून याबाबत बोलण्यासाठी संजय राऊत यांची भेट घेतली आहे. बिहारमधील शिवसैनिकांची जी मागणी आहे ती संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती बिहार शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी वार्ताहारांशी बोलताना दिली. तसेच जे आमच्या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात, असे सुद्धा शर्मा यांनी म्हटले.

तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा २४३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार बिहारमधील विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात होणार असून २८ ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

मतदानासाठी एक तासाचा अवधी वाढवला

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोप यांनी सांगितल्यानुसार, ‘कोरोनाच्या अनुषंगाने नवीन तयार करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांनुसार निवडणूका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर एका बुथवर केवळ एक हजार मतदार मतदान करतील. या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे वाढवण्यात आली असून, आणखी एका तासाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. म्हणजे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करतील.’