Bihar Elections 2020 : पोस्टल बॅलेटच्या मोजणीत तेजस्वींना आघाडी

पाटणा : पोलीसनामा ऑनलााइन – अख्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी( bihar-assembly-election-result) सुरू झाली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी (postal-ballot-counting) सुर आहे. यात तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बिहारमधील विविध भागात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआआघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळताना दिसत आहे. सध्याच्या कलांनुसार महाआघाडीचे उमेदवार 100 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएचे उमेदवार 59 जागांवर आघाडीवर आहेत. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या लोकजनशक्ती पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

पराभव झाल्यास नितीशकुमारांवर खापर
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीत एनडीएला विजय मिळाल्यास त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना जाईल. एनडीएचा पराभव झाला तर त्याचे खापर नितीशकुमारांच्या डोक्यावर फुटेल, अशी रणनीती भाजपची आहे.

भाजपशासित राज्यांनाही बसला होता फटका
नितीशकुमारांच्या राजवटीत 2019- 20 आर्थिक वर्षात बिहारच्या ठोकळ उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम समाजकल्याण योजनांवर खर्च झाला होता. त्याचे लाभ मिळत असूनही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले. याआधीच्या विशेषत: भाजपशासित राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तेथील मुख्यमंत्र्याच्या कामगिरीवर नाराज जनतेने शिवराजसिंह चौहान, रमणसिंह यांना सत्तेवरून दूर केले होते. लोकप्रियता घटलेल्या नितीशकुमारांवरही हीच पाळी येणार, अशी चर्चा आहे.