बिहारमध्ये चमकी तापाने १०० बालकांचा मृत्यू, मंत्र्याबद्दल न्यायालयात तक्रार

मुजफ्फरपूर : वृत्तसंस्था – बिहारच्या मुजफ्फरपूर व परिसरात चमकी तापाने थैमान घातले असून (अ‍ॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आतापर्यंत १०० हून लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि मंगल पांड्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बिहार राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये ‘एक्यूट इन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ म्हणजेच एईएस (चमकी) आजाराची साथ पसरली आहे. या भागातील उष्णतेच्या लाटेमुळे हा आजार मुलांना होत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, चमकी तापामुळे होणारे मृत्यू लिचीमुळे होत आहेत, असे काही अहवालांमध्ये नोंद करण्यात आले आहे. मुजफ्फरपूर लगत घेतल्या जाणाऱ्या लिचीच्या उत्पादनात काही विषारी घटक असल्याचे बोलले जात आहे.चमकी तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या तापामुळे पीडित असलेली मुले ४ ते १४ वयोगटातील आहे.

बिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू ; कलम १४४ लागू –

चमकी तापाच्या साथीबरोबरच बिहारमध्ये गया जिल्ह्यात भयानक गर्मीची लाट उसळली आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. त्याअंतर्गत गयामध्ये सरकारी, निम-सरकारी, तसेच मनेरगा योजनेतून होणारी कामे, मैदानात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांना ११ ते ४ या वेळेत घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सिनेजगत

‘या’ अभिनेत्याला करायचाय ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीसोबत ‘इंटिमेट’ सीन

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…