भाजपाच्या ‘या’ खासदाराने उडवले विमान, प्रवाशांना घेऊन पोहचले दिल्लीहून पटण्याला

पटणा : बिहारच्या सारणचे खासदार राजीव प्रताप रूडी आज पहिल्या दिवशी पायलटच्या रूपात दिल्लीहून इंडिगो चे 6126 विमान घेऊन पटण्याला पोहचले. या विमानामध्ये जे लोक प्रवास करत होते ते खुप खुश दिसत होत. राजीव प्रताप रूडी म्हणाले, पॅसेंजर्समध्ये थोडी भिती होती, परंतु मी त्या लोकांना समजावले की हे तुम्हाला नवीन वाटत असेल, मी तर मागच्या दहा वर्षापासून अशाचप्रकारे पटण्याला येतो. ते म्हणाले, आजपासून पटणासाठी विमान सेवा सुरू झाली आहे जिचा कॅप्टन मी होतो, मी त्यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला की सर्व चांगले आहे, तुम्ही निरोगी आहात, वातावरण चांगले आहे आणि घाबरण्याची गरज नाही.

बिहारमध्ये होणार नाहीत क्वारंटाईन

राजीव प्रताप रूडी महणाले, बिहार सरकारने चांगली व्यवस्था केली आहे, कोणताही क्वारंटाईनचा नियम नाही. बिहार सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नव्हता. बाहेरून येणार्‍या प्रवाशांमध्ये थोडे कन्फ्यूजन झाले असेल, आमची चर्चा झाली होती, सिव्हिल सर्जनने ते सुरू केले होते, पण पटणा डीएमने ते ठीक केले आणि आता प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.

एयरहोस्टेसचे सहकार्य नसल्यासारखेच

प्रवासाबाबत ते म्हणाले, पॅसेंजरला नव्या पद्धतीने प्रवास करावा लागत आहे आणि खुप नवीन नियमसुद्धा आहेत. विमानात पाणी सुद्धा प्रवाशांना स्वत: घ्यावे लागत आहे. टॉयलेटचा वापर कमीतकमी करायचा आहे. प्रथमच यावेळी प्रवाशांना प्रवास करणे थोडे कठिण वाटत आहे. पंतप्रधानांचा हा मोठा निर्णय आहे की, आजपासून त्यांनी विमान प्रवास सुरू केला आहे. सध्या एक तृतीयांश विमाने सुरू आहेत. पटणा विमानतळावरून प्रवाशांची जास्त ये-जा होते. यासाठी हा चांगला निर्णय आहे. राज्य सरकारने सुद्धा चांगली व्यवस्था केली आहे. आता एयर लाइन्सनेसुद्धा चांगली व्यवस्था केली आहे.

मजूर आपले बांधव, सीएमचे हृदय मोठे

मजूरांच्या स्थितीवर ते म्हणाले, या युनिफॉर्ममध्ये याबाबत चर्चा करणे योग्य नाही, ते सर्व आपले बांधव आहेत आणि प्रश्न तर विचारला जाणारच की अखेर एवढ्या मोठ्या संख्येन लोक बिहारमध्ये का येत आहेत. हे बिहारसाठी सुद्धा एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान आपल्याला संधीमध्ये बदलावे लागेल. जे संपूर्ण भारत निर्मितीचे काम करतात, ते आज बिहारला परतत आहेत. आता त्यांची पुढील भूमिका बिहारच्या निर्मितीची असावी. मुख्यमंत्र्यांचे हृदय मोठे आहे आणि विचार मोठे आहेत, मला वाटते देशाचे पंतप्रधान मोदी असोत की बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार असोत, जरूर त्यांच्या मनात काही तरी गोष्ट असेल, कारण यावर धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

कोरोना व्हायरसमुळे मोठ्या कालावधीपासून बंद असलेली विमान सेवा दोन महिन्यानंतर सोमवारी सुरू झाली आहे. सध्या देशांतर्गत सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विमानतळावर मास्क घालणे प्रवाशांना बंधनकारक आहे. सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. याशिवाय प्रवाशांचे लगेजसुद्धा सॅनिटाईज केले जात आहे. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले गेले आहे.