काँग्रेसच्या आमदाराचा पत्नीसोबतचा ‘बेडरूम’धील ‘तो’ Tik Tok व्हिडीओ ‘व्हायरल’, SP च्या ‘जनता’ दरबारात धाव

सिकंदरा (बिहार) : वृत्तसंस्था – बिहारमधील सिकंदरा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आमदाराला पत्नीसोबत बेडरुममध्ये टिकटॉक व्हिडीओ बनवणे चांगलेच महागात पडले आहे. आमदाराने बनवलेला पत्नीसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे समाजातील आपली प्रतिमा खराब होण्याची भीती आमदाराला आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांनी भरवलेल्या जनता दरबारात धाव घेत याची तक्रार केली आहे.

सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी असे या आमदाराचे नाव असून त्यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. विरोधकांनी पत्नीचा मोबाईल हॅक करून त्यांचा खासगी व्हिडीओ व्हायरल केला. व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ अत्यंत खासगी असून हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कडक शासन करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

आमदार चौधरी आणि त्यांच्या पत्नीचा बेडरुमधील खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चौधरी यांनी आपल्या पत्नीसोबत टिकटॉक व्हिडीओ बनवला होता. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चौधरी यांची डोकेदुखी वाढली आहे. आमदार चौधरी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पत्नीसोबत टीकटॉक व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ खासगी होता. कोणीतरी त्यांच्या पत्नीचे टीकटॉक अकाऊंट हॅक करून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. विरोधकांचे हे कृत्य असल्याचा आरोप करून आपली बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ वेगवगेळ्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like