मोदींचा PK यांच्यावर ‘हल्लाबोल’, 2014 मध्ये BJP गोडसेवादी कशामुळं वाटत नव्हती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या महिन्यात जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून काढून टाकल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पटना येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांना वडील म्हणून संबोधित केले. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांना भाजपचे पिछलग्गू असल्याचे म्हंटले. प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी संतप्त होत म्हंटले की, त्यांनी प्रथम नितीश यांचे वडील म्हणून वर्णन केले आणि नंतर त्यांच्यासाठी पिछलग्गूसारख्या शब्दांचा प्रयोग केला.

पत्रकार परिषदेदरम्यान प्रशांत किशोर यांनी भाजपला नथुराम गोडसेच्या विचारधारा असणारा पक्ष म्ह्णून संबोधले, यावर सुशील मोदींनीही त्यांना प्रश्न विचारला कि, २०१४ मध्ये जेव्हा प्रशांत किशोर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रचार करत होते. त्यावेळी भाजपाने त्यांना गोडसे पक्ष म्हणून वाटला नाही का ? सुशील मोदींनी पुढे प्रशांत किशोर यांना विचारले की, गेली अडीच वर्षे नितीशकुमार बिहारमध्ये भाजपाचे सरकार चालवत आहेत आणि यावेळी प्रशांत किशोर यांना भाजप गोडसे वादी पक्ष का वाटला नाही?

प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना सुशील कुमार मोदी म्हणाले की, कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची कोणतीच विचारधारा नसते, परंतु ते त्यांच्या प्रायोजकांची विचारसरणी आणि भाषा ताबडतोब स्वीकारण्यात पटाईत आहेत. दरम्यान, सुशील मोदी यांनी प्रशांत किशोर त्यांना नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून ढोंगी असल्याचे म्हंटले आहे.