PM मोदींच्या मनात नेमकं काय ?, भाषणात चिराग पासवान यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही

सासाराम : वृत्तसंस्था – बिहार निवडणुकीतील (Bihar Legislative Assembly election, 2020) एनडीच्या (NDA) प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सासाराम (Sasaram) येथे पहिली प्रचारसभा घेतली. यावेळी मोदींनी विरोधी पक्षांवर टीकाच नव्हे तर त्यांची प्रशंसा केली आणि राष्ट्रीय जनता दलावर (Rashtriya Janata Dal)नाराज असलेल्या मतदारांना देखील एनडीएकडे खेचण्याचा प्रयत्न केला. या सभेतला सर्वात मोठा मुद्दा असा की, मोदी यांनी लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही.

रामविलास पासवान यांना वाहिली श्रद्धांजली परंतु चिराग यांचा उल्लेख नाही

पीएम मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांची प्रशंसा करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु त्यांच्या संपूर्ण भाषणात लोक जनशक्ती पक्ष किंवा चिराग पासवान याबद्दल काहीच उल्लेख नव्हता. यानंतर आता ही बाब पहाता भाजपची चिराग पासवान यांच्याबद्दल नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही. याबाबत संभ्रम कायम राहिला आहे.

राजपूत मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पीएम मोदींनी रामविलास पासवान यांच्यासोबत रघुवंशप्रसाद सिंह (Raghuvansh Prasad Singh) यांनाही श्रद्धांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, बिहारनं आपल्या 2 सुपुत्रांना गमावलं आहे. पहिले सुपुत्र म्हणजे ज्यांनी बिहारच्या लोकांची 2 दशकं सेवा केली ते रामविलास पासवान. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहिले. रघुवंशप्रसाद सिंह यांनी गरिबांच्या उत्थानासाठी निरंतर काम केलं. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो असंही ते म्हणाले.