Bihar Election 2020 : निवडणुकीच्या प्रचारसभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकण्यात आल्या चपला ! (व्हिडीओ)

 पाटना : वृत्तसंस्था –    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Legislative Assembly Election 2020) प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. नेते मंडळी रॅली आणि प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav)यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक प्रचारादम्यान हा प्रकार समोर आला आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात तेजस्वी यादव उमेवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार तेजस्वी यादव यांच्या या सभेत एका व्यक्तीनं त्यांच्या दिशेनं चप्पल फेकून मारली. तेजस्वी यादव व्यासपीठावर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्याचवेळी एकानं त्यांच्या दिशेनं चप्पल भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूनं गेली. त्यांना ती लागली नाही. दुसरी चप्पल मात्र थेट त्यांना लागताना दिसत आहे. यानंतर सभेत एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे.

तेजस्वी यादव हे प्रचारसभेसाठी हजर राहिले होते. तेजस्वी व्यासपीठावर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिव्यांग व्यक्तीनं त्यांच्यावर चप्पल भिरकावली. या घनटेनंतर सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला सभेतून बाहेर काढलं. एका हिंदी वेबसाईटनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.