बिहार निवडणूक : तेजस्वीचा नीतीश कुमारांवर हल्ला, म्हणाले – बाणाचा जमाना गेला, आता आहे मिसाईलचे युग

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार निवडणुकीपूर्वी नेत्यांचे एकमेकांवर वार-पलटवार सतत सुरू आहेत.रविवारी बिहारविधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या निवडणूक सभेत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. तेजस्वीने म्हटले की, नीतीश कुमार म्हणतात की, लालटेनचा जमाना गेला, परंतु मी त्यांना सांगतो की, बाणाचे युग समाप्त झाले आहे. आता त्याची जागा मिसाईलने घेतली आहे.

त्यांनी म्हटले की, बिहारमध्ये कोरोना पीडितांवर अन्याय झाला आणि यामध्ये मोठा घोटाळा केला आहे. तेजस्वी यांनी या घोटाळ्याला कोरोना घोटाळा नाव दिले आहे. तर तेजस्वीने नाव न घेता चिराग पासवान यांच्या लोजपावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने आपल्या बी टीमला उतरवले आहे.

तेजस्वी यांनी भाजपा आणि जेडीयूवर हल्ला करताना म्हटले की, 15 वर्षात बिहारमध्ये एक सुईचा कारखाना सुद्धा उभारला गेला नाही. तर माझ्या वडीलांनी मधेपुरा आणि मढौरामध्ये रेल्वे कारखाने सुरू केले. नीतीश कुमार यांनी महाआघाडीचे सरकार पाडून लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या जनादेशाला आणि राज्यातील संपूर्ण जनतेला धोका दिला आहे.