Video : ‘नितीश कुमारांना सन्मानानं निरोप देण्याची जनतेला संधी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असून माझ्या पक्षाला विजयी करा, असे भावनिक आवाहन एक सभेला संबोधित करताना बिहारी जनतेला केलं होते. त्यावरती आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खोचक अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एएनआय या वृत्तमाध्यमाशी बोलताना राऊत म्हणाले, “नितीश कुमार हे मोठे नेते आहेत. त्यांनी आपला डाव खेळला, जर कोणी नेता म्हणत असेल ही माझी शेवटची निवडणूक आहे. तर त्यांना सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनताही नितीश कुमारांना निरोप देण्याच्या संधीची वाट पाहत होती, या निवडणुकीत जनता नितीश कुमारांना निवृत्त करेल,” असा चिमटा राऊत यांनी काढला.

नितीश कुमार यांना काँग्रेसचाही टोला

“नितीश कुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगून निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे. ही आपली शेवटची निवडणूक हे वक्तव्य म्हणजेच अपयशावर दया याचना,” असा टोला काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लगावला.

काय म्हणाले होते नितीश कुमार !

“ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड, असे म्हणत नितीश कुमार यांनी आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. मतदान आहे ही माझी शेवटची निवडणूक आहे, आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना,” असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता.