Bihar Election Results : ओवेसींच्या पक्षानं 5 जागा जिंकत RJD ला 11 जागांवर दिला धक्का, सीमांचल प्रदेशातून MIM ला मिळाली मते

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    बिहार निवडणुका 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा नितीशकुमार यांचे जेडीयू आणि भाजप एकत्रित सरकार बनणार आहेत. मात्र, यावेळी निवडणुकांमध्ये जेडीयूने 243 पैकी 43 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने 74 जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय जनता दल 75 जागा जिंकणारा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, तर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पाच जागा जिंकल्या आहेत.

एआयएमआयएमने बिहारमधील 20 जागा लढवल्या

ज्यात सीमांचलमधील पाच जागा जिंकल्या. निवडणूक विश्लेषक आणि कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा असा विश्वास आहे की जर ओवेसी कॉंग्रेस, आरजेडीशी युती करून निवडणुका लढवल्या असत्या, तर आरजेडीने इतर 11 जागा जिंकल्या असत्या. मुस्लिम मताबरोबरच एआयएमआयएमने दलित आणि मागासवर्गीयांची मतेही मिळविली. अमोरी, वायसी, जोकीहाट आणि कोचाधामन या जागा ओवेसी यांच्या पक्षाने जिंकल्या.

स्लिम मतांचे दावेदार होते आरजेडी, एमआयएमआयएमला मिळाली मते

सीमांचलच्या या मतांसाठी राजद उमेदवार होते. पण तसे होऊ शकले नाही. बसप, एलजेपी या पक्षांच्या तुलनेत ओवेसी यांच्या पक्षाने आरजेडीला मोठा धक्का दिला. 2015 च्या निवडणुकीत ओवीच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. पण या विजयामुळे ओवेसींचा दरारा बिहारमध्ये वाढला आहे. निवडणूक पंडितांचा असा विश्वास होता की एलजेपीदेखील आरजेडीला टक्कर देईल, परंतु आरजेडी भाजपा-जेडीयूप्रणित एनडीएला त्याच जागेवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यापासून पक्षाला रोखता आले नाही.

कॉंग्रेसने ओवेसी यांना धरले जबाबदार

कॉंग्रेस (19) आणि आरजेडी ( 74) यांनी मिळून 93 जागा जिंकल्या. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी महागठबंधनाच्या यशाचे अभिनंदन केले आणि महायुतीच्या पराभवासाठी ओवेसी यांना दोषी ठरवले. ते म्हणाले, “तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार निवडणुकीत झालेल्या यशाबद्दल मी महागठबंधनाचे अभिनंदन करतो. पुन्हा एकदा ओवेसी जी यांच्या एमआयएमने निवडणूक लढवून भाजपला अंतर्गत मदत केली. हे पाहिले पाहिजे की, बिहारमधील भाजप आणि जेडीयूचे सरकार स्थापनेत एनडीएया समर्थन देईल की महागठबंधनला.