Bihar Result : ’मोदी मॅजिक’नं भंग केलं ‘तेजस्वी’चं स्वप्न, ‘ही’ आहेत NDA च्या विजयाची 5 कारणं

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली. एनडीएच्या विजयाचे सर्वात मोठे नायक पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले आणि ’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 9 जागा मिळाल्या.

पुन्हा चालली मोदी मॅजिक
बिहार विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी मॅजिकने कमाल केली. लागोपाठ 15 वर्ष बिहारमध्ये नीतीश कुमार यांचे सरकार आहे, अशात जनतेची सरकारवर नाराजी असूनही मोदी ब्रँड जोरदार चालला आहे.

ही आहेत भाजपाच्या विजयाची कारणे
1. जेव्हा लोक तेजस्वी यादव यांच्या रॅली पाहून विजय-पराभवाचा अंदाज लावत होते, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 12 रॅलींतून विश्वास दिला की विजय सुशासनाचा होईल.

2. नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यांना जंगलराजचा युवराज म्हणत बिहारला लालू यादव यांच्या 15 वर्षांच्या जंगलराजची आठवण करून दिली आणि कुटुंबवादाच्या विरूद्ध विकासवाद उभा केला.

3. पीएम नरेंद्र मोदी यांनी बिहारला विकासवादाच्या मुद्द्याशी जोडले. डबल युवराजच्या विरोधात डबल इंजिनची घोषणा दिली आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा विश्वास वाढवला.

4. बिहारमध्ये नीतीश सरकार विरोधी लाटेला नरेंद्र मोदींनी निष्प्रभ केले आणि रोजगार देण्याचा विश्वास देत बिहारला सांगितले की, विरोधकांना भारत माता की जय आणि जय श्रीराम च्या घोषणांची भिती का वाटते?

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आणि केंद्राच्या योजनांच्या मिळालेल्या लाभामुळे सुद्धा एनडीएच्या बाजून मोठे मतदान झाले.