शरद पवारांचा विक्रम मोडण्यासाठी बिहारमध्ये ‘तेजस्वी’ यादव सज्ज

पटणा : पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभा (Bihar Election 2020 ) निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. एक्झिट पोलनुसार ( Exit Polls) बिहारच्या निकालांमध्ये चुरस दिसून येत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात काँग्रेस-आरजेडी (Congres- RJD)ला मोठे यश मिळणार असल्याचा जनतेचा कल दिसून येत आहे. त्यातच बहुतांश एक्झिट पोलने राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला यश मिळणार असल्याचे भाकित वर्तवले आहे. तसे झाले तर तेजस्वी यादव ( tejashwi-yadav)(वय 31) बिहारचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री होतील. तेजस्वी मुख्यमंत्री झाले तर नवा विक्रम रचू शकतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचादेखील विक्रम (sharad-pawar) मोडू शकतात. पवार हे वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.

बहुतांश एक्झिट पोलने, तेजस्वी यादव यांच्या बाजूने बिहारच्या लोकांनी कौल दिला असून, जर असे झाले तर पुढील मुख्यमंत्रिपदाची माळ तेजस्वी यादव यांच्या गळ्यात पडेल. आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यांच्यासाठी ते सर्वात मोठे गिफ्ट ठरणार आहे. आज तेजस्वी यादव यांचा वाढदिवस आहे तर उद्या (मंगळवारी) निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. या निकालात तेजस्वी आणखी एक विक्रम साध्य करू शकतात. बिहारमध्ये सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना सन्मान मिळू शकतो. यापूर्वी सतीश प्रसाद सिंह हे वयाच्या 32 व्या वर्षी 1968 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. तेजस्वी यादव हे 31 वर्षांचे आहेत. जर तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर ते नवा विक्रम रचू शकतात. वास्तविक पौड्डेंचरीचे एमओएच फारुख हे वयाच्या 29 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले आहेत, परंतु पौड्डेंचरीला राज्याचा दर्जा नाही, तो केंद्रशासित प्रदेश आहे.

असा आहे Exit Polls अंदाज

1) रिपब्लिक भारत-

रिपब्लिक भारत आणि जन की बातने केलेल्या एक्झिट पोलनुसार पासवान यांनी जदयूला 25 जागांवर नुकसान पोहोचविले आहे. एनडीएला 37-39 टक्के मतदान, महाआघाडीला 40-43 टक्के, एलजेपीला 7-9 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला 91-117 जागा, महाआघाडीला 118- 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एलजेपीला 5-8 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे.

2) एबीपी न्यूज- सीवोटर सर्व्हे-

एबीपी न्यूज आणि सीव्होटर सर्व्हेमध्ये एनडीएला 104 ते 128 जागा, तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला 108 ते 131 जागा, पासवान यांच्या एलजेपीला 1-3 आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

3) टाइम्स नाउ- C Voter-

बिहार विधनसभा निवडणुकीत टाइम्स नाउ- C Voter यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सर्व्हेमध्ये एनडीएला 116 जागा आणि महाआघाडीला 120 जागा देण्यात आल्या आहेत. एलजेपीला 1 जागा आणि अन्य 6 जागा.

4) Today’s Chanakya-

टुडेज चाणक्य यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये 63 टक्के लोकांना यंदा सत्ताबदल हवा आहे. 35 टक्के लोकांनी बेरोजगारी महत्त्वाचा मुद्दा म्हटले आहे. 19 टक्के लोकांना भ्रष्टाचार महत्त्वाचा मुद्दा वाटला, तर 34 टक्के लोकांना अन्य मुद्दे महत्त्वाचा वाटले आहेत.