‘या’ ४ कारणांमुळे बिहारमध्ये येतो वेळावेळी नद्यांना ‘पूर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे, राज्यातील २५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या पूराचा फटका बसला आहे, राज्यातील जवळपास १२ जिल्हे पाण्याखाली आहेत. आता पर्यंत ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक वर्षांपासून असणाऱ्या या समस्येवर सरकारने अनेक सुधारणाचे दावे केले असले तरी ते फोल ठरत आहेत. आजही तीच परिस्थिती आहे जी नेहमी पावसाळ्यात असते.
मागील ४० वर्षांपासून म्हणजेच १९७९ पासून बिहार मध्ये दरवर्षी पूर आला आहे. बिहार सरकारच्या जल संसाधन विभागानुसार राज्यातील ६८,८०० स्वेअर किमी दर वर्षी पूराच्या पाणी खाली बुडतो. या कारणांमुळे बिहारमध्ये येतो दरवर्षी पूर.

मागील दोन आठवड्यांपासून नेपाळ आणि बिहारच्या सीमाभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उत्तर बिहारमधील अररिया, किशनगंज, फारबिसगंज, पूर्णिमा, सुपौल, मधूबनी, दरभंग आणि कटिहार हे जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. तर बिहार मधील कोसी, कमला, बागमती, गंडक, महानंदा या मोठ्या नद्यांचे पाणी किनाऱ्याबाहेर येऊन वाहत आहेत. नेपाळ मध्ये जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तेव्हा दरवाजे खोलण्यात येतात, त्यामुळे बिहारमध्ये देखील नद्यांना पूर येतो.

इतर नद्यातून येणारा पाण्याचा प्रवाह आणि हिमालयातून गंगा नदीत मिळणाऱ्या इतर नद्या कोसी, गंडक, घाघरा नदीचे पाणी काठा बाहेर येते. त्यामुळे गंगेला मिळणाऱ्या या नद्यांमधील गाळ अखेर गंगेच्या मुखाशी जमा होतो आणि त्यानंतर गंगा नदी पात्र सोडून वाहते. नदीत गाळ नसेल आणि जलप्रवाह नीट राहिला तर अशी समस्या येणार नाही.

१९५४ मध्ये बिहारमध्ये १६० किमी तटबंध होता. तेव्हा २५ लाख हेक्टर जमीन पूराखाली येऊन प्रभावित होत होता. आता जवळपास ३७०० किमी तटबंध आहे परंतू पूराने प्रभावित क्षेत्र पूराने प्रभावित होऊन ६८.९० लाख हेक्टर झाले आहे.

जलग्रहण भागातील झाडांची छाटणी

बिहारच्या जलग्रहण क्षेत्रातील झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात येतात. त्यामुळे या भागात पाणी अडत नाही. पर्वत परिसरात नेपाळ आणि तिबेट मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. तेथून पाणी वाहून बिहारमध्ये येते. बिहारच्या नदी क्षेत्रात झाडे नसल्याने आता हे पाणी अडवले जात नाही. त्यामुळे हे पाणी रहिवासी भागात वेगाने पसरते.

बिहारमध्ये आलेले सर्वात मोठे पूर

२०१६ – १२ जिल्हांवर परिणाम, २३ लाख पेक्षा जास्त लोकांवर परिणाम, २५० पेक्षा आधिक लोकांचा मृत्यू

२०१३ – जुलै मध्ये आलेल्या पूराने २०० लोकांचा मृत्यू झाला. २० जिल्ह्यात शिरले पाणी, ५० लाख लोकांवर परिणाम

२०११ – पूरांचा २५ जिल्ह्यावर परिणाम. ७१ लाखहून आधिकांचे जनजीवन विस्कळीत, २४९ लोकांचा मृत्यू

२००८ – १८ जिल्ह्यांवर परिणाम, ५० लाख लोकांचे जीवन विस्कळीत, ३४ कोटी रुपयांच्या पीकांचे नुकसान

२००७ – २२ जिल्ह्यांत पूरांचा परिणाम, १२८७ लोकांचा जीव गेला, २.४ कोटी लोकांवर परिणाम.

२००४ – २० जिल्ह्यांवर परिणाम, ९३४६ गावातील २ कोटीपेक्षा आधिक लोकांवर परिणाम, ८८५ लोकांचा मृत्यू.

२००२ – २५ जिल्ह्यांवर पूराचा परिणाम, ४८९ लोकांचा मृत्यू, ८३१८ गावे जलमय

२००० – ३३ जिल्ह्यांवर पूराचा परिणाम, १२ हजार पेक्षा आधिक गाव जलमय, ३३६ लोकांचा गेला जीव

१९८७ – पूराचा परिणाम सर्वात जास्त परिणाम या वर्षांत झाला. ३० जिल्ह्यांवर याचा परिणाम झाला. १३९९ लोकांच्या मृत्यू झाला.

 

आरोग्यविषयक वृत्त

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like