‘या’ आमदारांची ‘स्टडी टूर’ कि ‘सहल’, अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील काही आमदारांचे अश्लील फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बिहारमधील हे आमदार स्टडी टूरसाठी मणिपूरमध्ये गेले होते. मात्र स्टडी टूरचे फोटो समोर येण्याऐवजी त्यांचा विचित्र अवस्थेतला व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या व्हिडिओत ते सर्व जण एका मुलीसोबत अश्लील नृत्य करताना दिसून येत आहेत.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात आणि देशभरात सध्या याची चर्चा सुरु आहे. यामध्ये आरजेडीचे एक आमदार आहेत. के. शिवचंद्र राम असे त्यांचे नाव असून ते वैशाली जिल्ह्यातून येतात. मात्र त्यांनी आपला या व्हिडिओशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओत ते जबरदस्ती एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवताना दिसून येत आहेत.

यात त्या मुलीने हात झटकल्यानंतर देखील ते तिचा हात हातात घेऊन नाचत आहेत. त्याचप्रमाणे बळजबरी त्या मुलीला ग्लासातून द्रव्य पाजताना दिसून येत आहेत. दरम्यान, या चार आमदारांमध्ये आरजेडीचे दोन तसेच भाजप आणि जेडीयूचे प्रत्येकी एक आमदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्ट ईस्ट पॉलिसी’ या कार्यक्रमांतर्गत हे चार आमदार मणिपूरमध्ये गेले होते.

त्यांच्याबरोबर नाचणारी ती मुलगी किशोरवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला असल्याने या आमदारांवर त्यांचे पक्ष काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम