JDU नेते सुमारिक यादव हत्याकांडप्रकरणी माजी MLA कुंती देवी यांना जन्मठेप

गया : पोलीसनामा ऑनलाईन –  बिहारमधील सात वर्षापूर्वीच्या बहुचर्चित जेडीयु नेते सुमारिक यादव हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या माजी आमदार कुंती देवी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एडीजी कोर्टाने 19 जानेवारी रोजी कुंती देवी यांना दोषी ठरवले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

न्यायालयाने निकाल सुनावला त्यावेळी कुंती देवी हजर नव्हत्या. आजारी असल्याकारणाने त्यांना कोर्टात हजर राहता आले नाही. या प्रकरणात कुंती देवी यांना दोषी ठरवून कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये जेडीयू नेते सुमारिक यादव यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली होती. या घटनेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले होते. या प्रकरणी सुमारिक यादव यांचे बंधू विजय यादव यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे नीमचक बथानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यादव यांच्या हत्येचा आरोप कुंती देवी यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी 19 जानेवारीला कोर्टाने कुंती देवी यांना दोषी ठरवले असून त्यांना त्याच दिवशी अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.