‘नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखं’

पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षाना यश मिळाले आहे. मात्र, यात नितीश कुमार त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारले. तसेच मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणं हा जनतेचा मतांचा अपमान होईल. या परिस्थितीत नितीश कुमार जरी मुख्यमंत्री झाले. राजकीय कारकिर्दीचा तो दारुण पराभव असेल. शिवाय ही मोठी शोकांतिका ठरेल. जनता दल युनायटेड पक्षाला धूळ चारली आहे, अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नितीश कुमारांना फटका लगावल आहे.

तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहार नाही तर देशाला एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तेजस्वीच्या रूपाने बिहारला फक्त नेता मिळाला असं नाहीतर देशाला एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तेजस्वी यादवच्या अफाट बुद्धिमतेचे रूप विधानसभा निवडणुकीत समोर आले आहे. तो एकटा जिद्दीने लढत राहिला. तो जिंकला नसला तरी त्याने शिखर गाठले आहे. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद कायमच राहील.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
बिहारामध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवं. कारण बिहाराची सूत्रे आता त्यांचा हातात गेली आहेत. पण आकड्यांच्या खेळात ए न डी ए ला निसटता विजय मिळाला आहे. आणि खरा विजेता 31 वर्षाचा तेजस्वी यादव हाच आहे. आनंद साजरा होत असला तरी विजया मात्र तेजस्वी यादव यांचा आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहार आतला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या लढतीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी १२५ जागा मिळाल्या आहेत. विधानसभा २४३ आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत १२२ च आहे. तेजस्वी यादव यांच्या आघाडीस ११० जागा मिळाल्या. त्यांच्या जागा १०० ते ३०० च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गोंधळ घालून जागा लाटल्याचा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. ‘राजद’ ने ११९ विजयी उमेदवारांची यादी घोषित केली.

तेजस्वी यादव यांच्या आघाडीस ११० जागा मिळाल्या. त्यांच्या जागा १०० ते ३०० च्या फरकाने पराभूत झाल्या. काही तर मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गोंधळ घालून जागा लाटल्याचा आरोप तेजस्वी यांच्या पक्षाने केला. ‘राजद’ ने ११९ विजयी उमेदवारांची यादी घोषित केली पण निवडणूक अधिकारी नितीश कुमार यांच्या सूचनांचे पालन करीत आहेत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव त्यांच्या आघाडीचे किमान पंधरा उमेदवार पराभूत झाले. या पंधरा जागांनी बिहाराचं चित्र पालटून टाकलं. तेजस्वी यादव यांचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात थांबले.

चिराग पासवान हे नितीश कुमार यांचे पंख छाटण्यासाठी निवडणुकीत उभे करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले त्यामुळे नितीश कुमार यांच्या २० उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार नितीशकुमार यांच्या विरोधात होता. असा विरोधी प्रचार तेजस्वी यादव करत नव्हते. भारतीय जनता पक्षाचा खेळ यशस्वी झाला.

बिहारमध्ये भाकरी फिरली नाही ती करपली. नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखं आहे. तसंच तेजस्वी यादव यांना आता वाट पाहावी लागेल. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. अशी सुस्ती देखील शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली.