कलयुग ! जुगारात पत्नीला गमावलं, हवाली केलं नराधमांच्या हाती, गँगरेपनंतर त्यांनी अ‍ॅसिड फेकलं

भागलपूर : वृत्तसंस्था – जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर ॲसिड फेकले. बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. या प्रकरणी नराधम पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबरमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. येथील सरोजचे 10 वर्षांपूर्वी लोदीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीशी लग्न झाले होते. लग्नाला दहा वर्षे झाली तरी ती आई होऊ शकली नाही. सरोज हा यावरून तिला टोमणे मारत असे. तसेच नशेत तिला मारहाण करत असे. सरोजने नोव्हेंबरमध्ये आपल्या पत्नीवर जुगाराचा डाव खेळला. त्यात तो हरला. हरल्यानंतर त्याने तिला इतर जुगाऱ्यांच्या हवाली केले. सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता करू नये, यासाठी धमकावले आणि तिला मारहाण केली. पतीने तिच्यावर ॲसिड फेकले. यात ती गंभीररित्या होरपळली होती. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले.

उपचारानंतर पतीने तिने थेट माहेर गाठले आणि आपल्या कुटुंबीयांना आपबीती सांगितली. ही घटना नोव्हेंबरमध्ये घडली होती. कुटुंबीय आणि तिने रविवारी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम पतीला अटक केली आहे.