बिहारमध्ये वीज कोसळल्यानं 17 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये सध्या जोरदार मुसळधार पाऊस सुरु आहे. अशा वेळेत राज्यात आकाशातून पडणाऱ्या वीजेमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बिहार राज्य आपत्ती प्रतिबंधक एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, नुकत्याच झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत ज्यात १७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपत्ती निवारण विभागाने सांगितले आहे की, मृतांच्या संख्येत वाढही होऊ शकते. तसेच या भयानक परिस्थितीत सापडल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत. विभागाचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कैमूर आणि गया या जिल्ह्याच्यावेगवेगळ्या भागात वीज पडल्याने ३ – ३ लोकांचा मृत्यू झाला आहे, चंपारण, सीवान, भोजपुर, अरवल आणि पटनामध्ये २ – २ आणि कटिहारमध्ये एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा विभागाने केली आहे. येथे, राजधानी पटनामध्ये मंगळवारी रात्री पोलिस लाईनमध्ये एक प्रचंड झाड कोसळल्याने नऊ पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिस लाईनमध्ये एकच गोंधळ उडाला. घाईघाईत जखमींना पटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. येथे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही पोलिस लाईन गाठले आणि त्या स्थितीचा आढावा घेतला आणि जखमी पोलिसांच्या  प्रकृतीची विचारपूस केली.

Visit : Policenama.com 

You might also like