करवा चौथच्या दिवशीच पतीची ‘हैवानियत’, ब्लेडनं कापली पत्नीची जीभ

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था – करवा चौथच्या दिवशी पतीने पत्नीची जीभ ब्लेडने कापल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात सरैया गावात घडली. मीना खातून (वय 22) असे पीडितेचे नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गावातील लोकांनी आरोपी पतीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन सवतींमध्ये भांडणावरून संतप्त झालेल्या पतीने दुसऱ्या पत्नीची जीभ ब्लेडने कापली. एसकेएमसीएचच्या शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. अमलेंदू यांनी सांगितले की महिलेच्या जीभेसूर गंभीर जखमा झाल्या आहेत, शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त निघून गेले आहे.

घटनेच्या संदर्भात पीडितेची आई सक्रा फरीदपूर निवासी आयशा खातून यांनी जावई व मुलीच्या सवतीवर एफआयआर दाखल केली आहे. आरोपी पतीला अटक करून चौकशी केली जात असल्याचे पोलिस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघी सवती भांडत होत्या. दुसरी पत्नी मीना ओरडत घराबाहेर पडली. संतापलेल्या पतीने प्रथम तिला खोलीत बंद करुन तिला निर्दयीपणे मारहाण केली. नंतर ब्लेडने तिची जीभ कापली. जखमी महिलेला स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी आरोपी शफिकला खांबाला बांधून ठेवले आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

फसवणूक करून लग्न –
पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, पहिल्या पत्नीला मूल नसल्यामुळे आरोपीने मीनाची फसवणूक करून लग्न केले. यानंतर पहिल्या पत्नीसह त्याने तिला त्रास देणे सुरू केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी