मुख्यमंत्री नीतीशकुमार यांना पप्पू यादव यांच्या पत्नीचा इशारा; म्हणाल्या – ‘भर चौकात नाही उभे केले तर माझे नाव रंजीत रंजन नाही’

पाटणा : वृत्त संस्था – जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष आणि माजी खासदार पप्पू यादव यांची पत्नी रंजीत रंजन यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना इशारा दिला आहे. रंजीत रंजन यांनी ट्विट करत लिहिले आहे की, पप्पूजी कोरोना निगेटिव्ह आहेत, जर ते पॉझिटिव्ह झाले तर तुम्हाला सीएम निवासस्थानातून बाहेर काढून भर चौकात उभे केले जाईल. पप्पू यादव यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती.

पप्पू यादव यांची पत्नी रंजीत रंजन यांनी ट्विटरवर लिहिले, नीतीशजी, पप्पूजी कोरोना निगेटिव्ह आहेत, जर ते पॉझिटिव्ह झाले तर तुम्हाला, आणि या कटात सहभागी चार लोक तसेच अ‍ॅम्ब्युलन्स चोरांना सीएम निवासस्थानातून काढून भर चौकात नाही उभे केले तर माझे नाव रंजीत रंजन नाही.

त्यांनी दुसर्‍सा एका ट्विटमध्ये पुढे लिहिले की, नीतीशजी, काल संपूर्ण दिवस-रात्र जो तुमच्या प्रशासनाने पाटणा ते मधेपुरा नंतर तेथून वीरपुरपर्यंत पप्पू यादव यांच्याबाबतीत जो ड्रामा केला आहे, तो पहात आहोत. त्यांना मेडिकल फॅसिलिटी अजूनपर्यंत मिळालेली नाही.

पप्पू यादव यांच्या अटकेवरून वाद वाढला आहे. नीतीश कुमार यांच्याच पार्टीत विरोध सुरू झाला आहे. पप्पू यादव यांना मंगळवारी कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले होते. परंतु सायंकाळ होता-होता त्यांना 32 वर्ष जुन्या केसमध्ये अटक करण्यात आली.

पप्पू यादव यांची पत्नी रंजीत रंजन प्रत्येक घटनेत त्यांच्या सोबत उभ्या असतात. त्यांची लव्ह स्टोरीसुद्धा खुप प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी 1992 मध्ये दोघांचे प्रेम सुरू झाले होते आणि 1994 मध्ये लग्न झाले. पप्पू यादव यांची पत्नी रंजीत रंजन सुद्धा खासदार होत्या.