Coronavirus : नितीश सरकारचा निर्णय, आता संक्रमित रूग्णांना मिळणार होम आयसोलेशनची सुविधा

पाटणा : बिहारमध्ये कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता नितिश सरकारने निर्णय घेतला आहे की, आता सक्रमित रूग्णांना होम आयसोलेशनची सुविधा मिळेल. याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव उदय कुमावत यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून नव्या गाईडलाइनची माहिती दिली आहे.

आपल्या पत्रात आरोग्य विभागाचे मुख्य सचिव उदय कुमावत यांनी म्हटले आहे की, कोणत्याही कोविड-19 संक्रमित रूग्णाला होम क्वारंटाइन किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांना अधिकृत करण्यात आले आहे.

सरकारच्या गाईडलाइनप्रमाणे संक्रमित व्यक्तीला होम आयसोलेशनची सुविधा तेव्हाच देण्यात येईल, जेव्हा त्याच्या घरी सेल्फ आयसोलेशन आणि अन्य कौटुंबिक संपर्काला क्वारंटाईन करण्याच्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.

होम आयसोलेशनमध्ये राहात असताना संक्रमित रूग्णांला नियमित आपले आरोग्य मॉनिटर करावे लागेल तसेच कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा लागेल, जेणेकरून योग्य उपचार व्यवस्था करता येईल.

संक्रमित रूग्णांचे होम आयसोलेशन हे सॅम्पल कलेक्शनच्या 14 दिवसानंतर समाप्त होईल. मात्र, त्यामध्ये संसर्गाचे कोणतेही लक्षण नसावे. संक्रमित व्यक्तीला होम आयसोलेशनची सुविधा प्राप्त करण्यासाठी एक अंडरटेकिंग सुद्धा राज्य सरकारला द्यावा लागेल.