RJD च्या अजेंड्यावर JDU नं खेळली ‘चाल’, 72 तासांत 3 मोठे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी बदलली राजकीय समीकरणं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सध्या बिहारमधील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशात नितीशकुमार आपले राजकीय समीकरण बनविण्यात व्यस्त आहेत. गेल्या ७२ तासांत बिहार विधानसभेत नितीशकुमार यांनी तीन मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यात राज्यात एनआरसी न देण्याच्या प्रस्तावास आणि २०१० च्या फॉर्मेटवर एनपीआर करण्याचा प्रस्ताव पास केला तर गुरुवारी जातनिहाय जनगणनेसंदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला. नितीश कुमार यांच्या या मास्टरस्ट्रोकमूळे त्यांना निवडणुकीत किती फायदा होईल हे तर येणारी वेळच स्पष्ट करेल. पण त्यांच्या या डावाने आरजेडी आणि भाजपाला अस्वस्थ जरूर केले आहे.

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या तीन अजेंडाच्या मदतीने बिहारमधील आपले राजकीय मैदान मजबूत करण्यात व्यस्त आहे. नितीशकुमार यांनी फक्त आपली वोट बँक मजबूत केली नाही तर असा संदेश ही दिला की तेच बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. याचाच परिणाम म्हणून नितीशकुमार यांचे प्रखर विरोधक असलेले मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे सूरही बदलले आहेत आणि आता ते नितीशकुमार यांनाच बिहारचे सर्वात प्रभावी मुख्यमंत्री म्हणून संबोधत आहेत.

जातीय जनगणनेचा प्रस्ताव पास

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहार विधानसभेत जातीची जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला. आरजेडीबरोबरच भाजपनेही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. या निर्णयामुळे नितीश कुमार स्वत:ला मागासलेल्यांचा विश्वासू नेता म्हणून प्रस्थापित करत आहेत, जे की फक्त विपक्षच नाही तर भाजपाला देखील निवडणुकीच्या रिंगणात आपल्या शक्तीचा परिचय करून देत आहेत.

मुख्यमंत्री नितीश भाजपाबरोबर दुसऱ्यांदा जाण्याच्या पार्श्वभूमीवर आरजेडी ने मागासवर्गीय आणि दलित मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर केला. तेजस्वी यादव यांच्या ओबीसींमध्ये वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर नितीश यांना ओबीसींच्या या विविध जातींप्रती विश्वासपात्र होणे आवश्यक वाटत आहे. या कारणास्तव जात गणनेची पटकथा लिहिण्यात आली आहे.

बिहारमध्ये NRC लागू होणार नाही

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात मंगळवारी बंद खोलीत २० मिनिटांची भेट झाली. नितीशकुमार यांनी भाजपाचा विचार न करता आरजेडीने विधानसभेत आणलेल्या एनआरसी विरोधातील ठराव मंजूर केला. संसदेत जेडीयूने सीएएला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शविला, त्या कारणामुळे पक्षात निदर्शनेही झाली आणि बिहारमध्ये एनआरसी-सीएएविरोधात निदर्शने देखील केली जात आहेत.

निषेधाचा हा आवाज नितीश कुमार यांना त्रास देण्याआधी नितीश यांनी आता चाल सुरु केली. कारण त्यांना वाटले की अल्पसंख्याक समाज त्यांच्यापासून दूर जाऊ लागला आहे. या माध्यमातून त्यांनी मुस्लिमांना एक मोठा संदेशही दिला की, भाजपबरोबर असूनही त्यांना मुस्लिमांच्या अधिकाराबद्दल काळजी वाटते. नितीश यांचे मित्रपक्ष हे भाजपच्या मूळ अजेंड्यातील एनआरसीचा भाग असला तरी नितीश यांनी भाजपची चिंता न करता हे निर्णय घेतले आहेत.

नितीश यांची भाजपाबरोबर युती

बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजकीय परिस्थितीत हे जवळपास निश्चित आहे की नितीशकुमार हे यावेळी देखील एनडीए आघाडीबरोबर निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. नितीश कुमार यांनी याबाबतचे संकेत दिले असून भाजपने त्यांच्या नेतृत्वात निवडणुका घेण्याचीही घोषणा केली आहे. असे असूनही, जर आपण भूतकाळाकडे पाहिले तर असे दिसते की २०१५ च्या निवडणुकीत नितीश कुमार आरजेडी सोबत महाआघाडीचे नेते म्हणून सत्तेवर आले होते, परंतु नंतर ते भाजपबरोबर सत्तेत आले. अशा परिस्थितीत नितीशकुमार कोणती राजकीय पावले उचलतील हे कोणीही सांगू शकत नाही.