क्रुरतेचा कळस ! मूलबाळ होत नसल्यानं वेळावेळी टोमणे मारणार्‍या सासूचा खून, सुनेनं मृतदेहाचे डोळे फोडले अन् बोटं कापली

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन –  मुलबाळ होत नसल्याने टोमणे मारणाऱ्या सासूची सुनेने धारदार चाकूने भोकसून हत्या केल्याचा प्रकार बिहार मधिल पाटणामधून समोर आला आहे. सुनेला ऐवढा राग अनावर झाला की, भोकसून काढल्यानंतर सुनेने सासुचे डोळेही फोडले व बोटंसुद्दा कापून टाकली. त्यानंतर स्वत:ला आग लावून घेतली. हा भयानक प्रकार बघून गावकऱ्यांना धक्काच बसलेला बघायला मिळाला. ललिता देवी सुनेचे तर धर्मशीला देवी सासूचे नाव आहे. ही घटना परसा बाजार पोलीसांच्या हद्दीमधील सकरैच्या भागात घडली आहे.

सविस्तर वृत्र असे की, आपली सासू साखरी मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन सतत टोमणे मारत असल्याच्या रागातून सुनेने सासुची (धर्मशीलाची) चाकूने भोकसून हत्या केली त्यानंतर डोळे फोडली व बोटं कापली. व स्वत:ही सुन (ललिता) हिने पेटवून घेतले . मात्र पेटवून घेतल्यानंतर आगेच्या ज्वालांमध्ये लपटेलेल्या अवस्थेत ललिता घराबारेर पडली यावेळी शेजारील नागरिकांनी ललिताला वाचविण्यासाठी धाव घेतली व तिच्या अंगावर कपडे टाकून आग विझवली तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली असून त्यांनी धर्मशीला देवी यांचा मृत देह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढिल तपास पोलीस करत आहेत.