अंदर की बात ! भाजप आणि जेडीयू यांच्यातील मैत्रीत ‘दूरावा’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कधी भांडण तर कधी मैत्री अशी युती असलेल्या भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोघांमध्ये मोठा पक्ष कोणता यावरून सध्या वाद सुरु असून यामध्ये कोण जिंकतो आणि कोण मोठा पक्ष म्हणून समोर येतो यासाठी दोघांमध्ये लढाई सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याआधी या दोन्ही पक्षांच्या मैत्रीला कधी सुरुवात झाली आणि त्यांच्यात कशाप्रकारे नंतर वाद झाले याची आज आपण माहिती घेणार आहोत.

सर्वात आधी संयुक्त जनता दल हे समता पार्टी म्हणून ओळखली जात असे. जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे सर्वात आधी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांना जोरदार दणका दिल्यानंतर त्यांच्याकडे एक होण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यावेळी दोघांनी वेगवेगळ्या निवडणूक लढल्या होत्या. त्यामध्ये भाजपला 53 जेडीयूला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले होते होते. मात्र त्यानंतर दोघांनी एकत्र येत आपल्या मैत्रीच्या पर्वाला सुरुवात केली. 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 18 जागांवर यश मिळाले तर समता पार्टीला सहा जागांवर यश मिळाले. त्यानंतर 2000 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 67 जागा जिंकता आल्या तर समता पार्टीला कमी जागांवर यश मिळाले. मात्र त्यानंतर 2003 मध्ये समता पार्टी हि संयुक्त जनता दल झाल्यावर झालेल्या 2005 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र सात दिवसांत त्यांनी बहुमत गमावले आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

लालूप्रसाद यांना सत्तेतून उतरवले खाली
2005मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने निवडणूक एकत्रित लढली आणि लालू प्रसाद यांना सत्तेतून खाली खेचले. त्यावेळी जास्त जागा जिंकून देखील भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. 2010 मध्ये देखील दोघांनी शानदार विजय मिळवत पुन्हा सत्ता मिळवली. मात्र यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कमी जागांवर उमेदवार देऊन देखील भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या जास्त होती.

त्यानंतर 2010 मध्ये नरेंद्र मोदी यांचा कालखंड सुरु झाल्यानंतर नितीश कुमार हे मोदी यांच्याविरुद्ध उभे राहिले. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात मतभेद होण्यास सुरुवात झाली. आणि शेवटी 2013 मध्ये दोघांमधील जुनी मैत्री तुटली. मात्र त्याचा परिणाम जेडीयूला लोकसभा निवडणुकीत दिसून आला. त्यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांनी एकत्र निवडणूक लढवत भाजपचा दारुण पराभव केला होता.

दीड वर्षांतच तुटली महायुती
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर लालू प्रसाद आणि नितीश यांची युती तुटली . त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू पुन्हा एकत्र लढले आणि बिहारमध्ये 40 पैकी 39 जागांवर या आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले. मात्र आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like