आधी १७५ आणि आता ७०  पोलीस प्रशिक्षणार्थी  कर्मचाऱ्यांनवर होणार कारवाई 

पटना :  वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी बिहार मधील  १७५ पोलीस प्रशिक्षणार्थी  कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाने निलंबित केले होते. पोलीस मुख्यालय  आणखी ७० पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे वृत्त आले आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की,  बिहारमधील पटना पोलीस लाइनमध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली तसेच  सीसीटीव्हीच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या  १७५ पोलीस प्रशिक्षणार्थी  कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाने  निलंबित केले होते. यादरम्यान सीसीटीव्हीमध्ये आणखी ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
इतकेच नव्हे तर, ज्या प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात बुद्धा कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर  त्यांना अटक करण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलल्या जाणार आहे. याप्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात  चौकशी समिती पुरावे गोळा करण्याचे काम  करत आहे.
विशेष म्हणजे  वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील नाराजी वाढल्याने  बिहारमध्ये जवळजवळ  ४०० प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला होता. यादरम्यान प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी सविता पाठकचा मृत्यू झाल्याने  सर्वजण नाराज होते. संतापलेल्या प्रशिक्षणार्थींनी डीएसपी मोहम्मद मसहलुद्दीन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झालेले ग्रामीण एसपी, शहर एसपी तसेच डीसीपींशी वाद घालत त्यांच्याशीही गैरवर्तवणूक केली.
धक्कादायक म्हणजे सविताला डेंग्यू झाला असतानाही वरिष्ठांनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला होता म्हणून हा उद्रेक झाला असे समोर आले.