खळबळजनक ! भारतात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ नावाने WhatsApp ग्रुप चालविणारा युवक ‘गोत्यात’

पटना : वृत्तसंस्था – बिहार पोलिसांनी बेटिया शहरातील एका तरूणाला अटक केली आहे. या तरुणावर व्हॉट्सअ‍ॅपवर पाकिस्तान धार्जिणा ग्रुप चालविल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपीला पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सद्दाम कुरेशी (वय २२) असे या युवकाचे नाव आहे. सद्दाम हा या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन होता. हा ग्रुप ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नावाने चालविला जात होता.

हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ज्या मोबाईलवरून चालवला जात होता तो मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. देशातील एकता आणि अखंडतेला हानी पोहचविण्याच्या कट रचण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सद्दाम कुरेशी याचे संबंध पाकिस्तानशी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

काही दिवसापूर्वी कर्नाटक पोलिसांनीही अशाच एका प्रकरणात एका महिला शिक्षिकेला अटक केली होती. या महिलेने सोशल मीडियावर पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या अनेक पोस्ट केल्याचा महिलेवर आरोप होता. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

दुसर्‍या घटनेत मुंबईतील नालासोपारा भागात दहशतवादी हल्ल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या मेसेजमधून राधा नगर आणि ओसवाल नगरी भागात दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात होते. यावर पोलिसांनी अनेक संशयितांवर आणि ठिकठिकाणी छापे टाकले पण पोलिसांना संशयास्पद काहीही मिळालेले नाही. आता पोलिसांना खात्री पटली आहे की या भागातील लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा अफवा परवल्या जात आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त