आरोपीला पकडण्यासाठी बंगालमध्ये गेले होते बिहारचे पोलिस अधिकारी, रात्री उशिरा दरोडेखोरांनी मारून टाकलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालमध्ये बिहारच्या SHO ला मारहाण करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, SHO बंगालमधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेले होते, परंतु त्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

हे प्रकरण बंगालमधील पंजीपाडा पोलीस स्टेशनच्या पनतापारा गावाचे आहे. या गावामध्ये एक गुन्हेगार लपला होता, त्याला बिहारच्या किशनगंजचे SHO अश्वनी कुमार वॉंटेड गुन्हेगाराला शोधण्यास गेले, परंतू गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पंजीपाडा येथून एका व्यक्तीला अटक केली आहे.

माहितीनुसार, शुक्रवारी-शनिवारी रात्री २ च्या आसपासची ही घटना आहे. किशनगंजची सीमा बंगलला लागून आहे. बंगालच्या पनतापारा गावात एका वॉंटेड गुन्हेगाराला शोधण्यासाठी अश्वनी एकटे निघाले. असे सांगितले जात आहे की, रात्रीच अश्वनी कुमार बंगालच्या स्थानिक पोलीस टेंशनमध्ये पोहोचले. तर तेव्हा पोलीस प्रमुख यांनी सांगितले की, ओडिओ त्यांच्या सोबत जाईल. ओडिओ ने सांगितले की तुम्ही जा, आम्ही येतो. अशात अश्वनी कुमार गावामध्ये एकटेच गेले. त्यानंतर गावकऱ्यांनी लाठी आणि दगडाने मारहाण करून त्यांची हत्या केली.

या प्रकरणात पूर्णिया रेंजच्या IG जी यांनी सांगितले की, ते एका बाईकच्या चोरीच्या प्रकरणात छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत इस्लामपूरचे SP होते. ते म्हणाले की या प्रकरणात आम्ही छापे टाकणाऱ्या गुन्हेगारांना अटक करू.

सध्या अश्वनी कुमार याचे पार्थिव बंगालच्या इस्लामपूर रुग्णालयात आहे. हे पूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर बिहार पोलीस असोशिएशनचे अध्यक्ष मृत्युंजय कुमार सिंह पीडितांच्या परिवाराला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने १-१ करोड रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.