तब्बल 64 एन्काऊंटर करणार्‍या रिटार्यड DCP ची ‘सुसाईड’ नोट लिहून आत्महत्या

पटना : वृत्तसंस्था – बंगळुरूमधील वरिष्ठ अधिकार्‍याच्या आत्महत्येनंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या पोलीस विभागात म्हणून नावलौकिक असलेल्या सेवानिवृत्त डीएसपी यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सेवानिवृत्त डीएसपी के चंद्रा यांच्या नावावर पोलीस दलात 64 एन्काउंटरची नोंद होती. पोलीस दलातील एनकाउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या के चंद्रा यांनी उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे मोठी खळबळ उडाली.

घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. कुटुंबीय आणि पोलीस विभागासाठी ही लिहिल्याची माहिती मिळाली आहे. के. चंद्रा हे खूप डिप्रेशनमध्ये होते. 16 वर्षांपासून ते यासाठी उपचारही घेत होते मात्र मानसिक आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत. ’मला माफ करा. डिप्रेशनमुळे मला गेले अनेक महिन्यांपासून झोपच लागत नाही. मला हे दु:ख सहन होत नाही. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. माझा मोबाईलनंबर सुरू ठेवा कारण घरातील सर्व महत्त्वाच्या कामांसाठी तो गरजेचा आहे. बँक, गॅस, वीज आणि आयकरसाठी तो महत्त्वाचा आहे. बँकेत जावून माझी पेन्शन बंद करून आईच्या नावाने सुरू करावी लागेल. मी गेल्या 16 वर्षांपासून खूप डिप्रेशनमध्ये आहे. यासाठी मी आजवर अनेक उपचार घेतले पण त्यातून बरा होऊ शकलो नाही.

कॉलनीमधील संतोष सिन्हा यांच्या छळामुळे हे डिप्रेशन शिगेला पोहोचले त्यांच्या छळाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे असे के. चंद्र यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिल्याची माहिती मिळाली आहे.’ बिहार पोलीस दलात 37 वर्ष सेवा केल्यानंतर के. चंद्रा यांची ओळख एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 64 एन्काउंटर केले याशिवाय अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. 2012 मध्ये के चंद्रा सोनपूरमधून रेल्वे डीएसपीपदावरून निवृत्त झाले. के चंद्राचा एक मुलगा मुंबईत बँक अधिकारी असून दुसरा पटना उच्च न्यायालयात वकील आहे.