बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार? केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली

पटना : वृत्तसंस्था –   राजस्थान, पंजाब या दोन राज्यानंतर आता बिहारमध्येही (Bihar) काँग्रेसमध्ये (Congress) फूट (split congress) पडण्याची शक्यता असल्याने कॉंग्रेस नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. बिहारच्या राजकारणात (bihar political) लोकजनशक्ती पार्टीचे (LJP ) 5 खासदार अचानक फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये फूट (split congress) पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुढील रणनीती अंतर्गत काँग्रेसमध्ये फूट पाडून एनडीए (NDA ) मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जेडीयू (JDU) अन् भाजपा (BJP) दोघांनीही आपापल्या रणनीतीवर काम करत आहेत. दरम्यान काँग्रेसचे अनेक नेते जेडीयूसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काँग्रेसचे अनेक नेते जेडीयू (JDU) नेत्यासोबत चर्चा करत आहेत.
केवळ संख्याबळाची वाट पाहत आहेत.
पक्ष मजबूत करण्यासाठी जेडीयूचे नेते अनेक मिशनवर काम करत आहेत.
गेल्या आठवड्यात काही नेत्यांसोबत जेडीयू नेत्याची बैठक झाली.
काँग्रेसकडे सध्या विधानसभेत 19 आमदार आहेत.
पक्षांतर बंदी कायद्यात न अडकण्यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आमदारांना पक्षात घेण्यासाठी 13 आमदारांची गरज (13 MLAs needed) आहे.
हा आकडा जुळवण्यासाठी अडचण येत आहे.
परंतु 13 आमदारांची साथ मिळताच जेडीयू काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान अलीकडेच जीतन राम मांझी मागील काही दिवसांपासून समन्वयक समितीच्या बैठकीची मागणी करत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत असल्याने NDA मध्ये खळबळ माजली आहे.
मी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत असल्याचे मांझी म्हणत आहेत.
तर दुसरीकडे मुकेश सहानी (Mukesh Sahani) यांचे वक्तव्य आणि मांझी यांच्यासोबत भेटीने NDA मध्ये सगळ काही ठीक असल्याचे दिसत नाही.
लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या वाढदिवशी मांझी तेजप्रताप यांच्या घरी पोहचले होते.
तिथे त्यांनी लालू यांच्यासोबत फोनवरून 10 मिनिट संवाद साधला.
त्यामुळे काँग्रेस फुटली तर सहकारी पक्षांवर अंकुश ठेवण NDA ला सोयीस्कर जाणार आहे.

Web Title :  bihar political crisis after ljp possibility big split congress may be 13 mla leave party

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Kolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट