Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ

पाटणा : वृत्तसंस्था – Bihar Political Crisis | महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथ विधी सोहळा सुरु असताना दुसरीकडे बिहारमध्ये (Bihar Political Crisis) भाजपला (BJP) धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. थोड्याच वेळापूर्वी नितीश कुमार यांनी राज्यापालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी राज्यपाल फग्गन सिंह कुलस्ते (Governor Faggan Singh Kulaste) यांची थोड्या वेळापूर्वी भेट घेतली आणि पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्विकारला आहे.

 

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांचे समर्थन असल्याची माहिती दिली. राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांना पहिली प्रतिक्रिया दिली, आम्ही एनडीएतून वेगळे झालो आहोत. एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाचा होता, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार थेट आरजेडी नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरी पोहोचले.
राज्यातील पुढील राजकीय वाटचालीत (Bihar Political Crisis) ही भेट फार महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.

 

Web Title : –  Bihar Political Crisis | nitish kumar resigns as chief minister of bihar breaks alliance with bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा