Bihar Political Crisis | ‘महाराष्ट्रात शिवसेना विश्वासघाताचे परिणाम भोगतेय’, भाजपचा नितीश कुमारांना इशारा

पाटणा : वृत्तसंस्था – Bihar Political Crisis | बिहारमध्ये आज मोठी राजकीय घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजप (BJP) आणि एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय (Bihar Political Crisis) घेतला. त्यांनी राजद (RJD) आणि महागठबंधनासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यापार्श्वभूमीवर भाजपनं त्यांना महाराष्ट्राचा (Maharashtra) दाखला देत इशारा दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेनं (Shivsena) आमच्यासोबत विश्वासघात केला त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय, असं भाजप नते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी म्हटलं.

 

सुशील मोदी म्हणाले, नितीश कुमार यांना आरजेडीमध्ये तो मान मिळणार नाही जो भाजपसोबत असताना मिळालाहोता. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री (CM) केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत, असा थेट इशारा मोदी यांनी नितीश कुमार यांना दिला.

 

 

बिहारमध्ये ‘तेजस्वी’ पर्व
बिहारमध्ये नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. जेडीयूचे नितीश कुमार आणि
आरजेडीचे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी राजभवन गाठून सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
आता या महाआघाडीचा शपथविधी (Swearing In) सोहळा बुधवारी (दि.10) म्हणजे उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पाटणा येथे दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम होईल. नव्या सरकारला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.

 

Web Title :- Bihar Political Crisis | shivsena betrayed us faced consequences bjp warning to nitish kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘त्या सर्वांच्या प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला, कहाण्या 8-10 दिवसात समोर येतील’

 

Pankaja Munde | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे पहिले ट्विट, म्हणाल्या…

 

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ