रिटायर्ड इंजिनियरच्या घरावर व्हिजिलन्सचा छापा, 4 कोटीपेक्षा जास्त संपत्ती जप्त

सिवान : उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणात रविवारी व्हिजिलन्सने सिवानचा रिटायर्ड इंजिनियर धनंजय मणी तिवारीच्या घरावर छापा मारला. या दरम्यान चार कोटीपेक्षा जास्त संपत्ती जप्त करण्यात आली आहे. रिटायर्ड इंजिनियर आणि त्याची पत्नी संजना तिवारीच्या विरोधात व्हिजिलन्सने 19 फेब्रुवारीला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणी एफआयआर दाखल केला, ज्यानंतर रविवारी सिवानच्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालवीय नगर परिसरात धनंजय मणी तिवारीच्या तीन मजली निवासस्थानावर छापेमारी केली आणि चार कोटीपेक्षा सुद्धा जास्त संपत्ती जप्त केली.

डीएसपी कन्हैयालाल यांच्या नेतृत्वात व्हिजिलन्सच्या टीमने रविवार सकाळी नऊ वाजताच्या सुमारस धनंजय मणी तिवारी यांच्या निवासस्थानी पोहचून छापेमारी सुरू केली जी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. छापेमारीच्या दरम्यान व्हिजिलन्सच्या टीमने धनंजय मणी तिवारी यांच्या घरातून 2.5 कोटींच्या जमीनींचे कागदपत्र, 22 बँक खाती, 10 लाखांचे दागिने, सुमारे 5 लाख कॅश, एसयूव्ही गाड़ी, सुमारे 17 लाखांची गुंतवणूक आणि विम्याचे कागदपत्र जप्त केले. माहितीनुसार, धनंजय मणी तिवारी यांनी 1993 मध्ये बिहार सरकारमध्ये नोकरी सुरू केली होती आणि मागील वर्षी ते रिटायर्ड झाले होते.

व्हिजिलन्सची टीम यावेळी धनंजय मणी तिवारी यांच्या उत्पन्नाला आधार मानू आपला तपास करत आहे आणि शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे की, कशाप्रकारे त्यांनी संपत्ती मिळवली. व्हिजिलन्सच्या सूत्रांनी सांगितले की, जर रिटायर्ड इंजिनियरच्या संपूर्ण नोकरीच्या दरम्यान त्यांचा पगार त्यांच्या सर्वप्रकारच्या उत्पन्नात जोडला तरी ते सुमारे 1.5 कोटी होतील, मात्र छापेमारीच्या दरम्यान व्हिजिलन्सच्या टीमला आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त संपत्तीची माहिती मिळाली आहे.

धनंजय मणी तिवारी यांना चार मुले आहेत, ज्यापैकी दोन मुली आहेत. दोन्ही मुली डॉक्टर आहेत ज्यापैकी एक पाटणाच्या आयजीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि दुसरी भुवनेश्वरमध्ये काम करते. धनंजय मणी तिवारी यांची दोन्ही मुले इंजिनियर आहेत. यापैकी एक बीएसएनएलमध्ये काम करतो आणि दुसरा जमालपुरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत कार्यरत आहे. धनंजय मणी तिवारी सिवान डिस्ट्रिक्ट बोर्डातून रिटायर्ड झाले होते.