आश्‍चर्यम् ! एकाच व्यक्‍तीचे २ ब्लड ग्रुप ; जाणून घ्या नव्या गोरखधंद्याबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये रक्त तपासणीच्या नावाखाली मोठा गोरखधांधा चालत असल्याचे उघड झाले आहे. एकाच तरुणाचे दोन लॅबने वेगवेगळे रक्तगटाचे रिपोर्ट दिल्यानंतर हा घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा उघड झाल्याने मोठा हडकंप माजला आहे.

या ठिकाणी तुषार चंद नावाचा एक तरुण आपला रक्तगट तपासण्यासाठी गेला. कॉलेजमध्ये फॉर्म भरण्यासाठी त्याला रक्तगट तपासून घ्यायचा होता. त्यावेळी डेहरी स्थित जख्खी बिगहा येथील कुमार पॅथो लॅब मध्ये आपला रक्तगट तपासला असता त्याला झटकाच बसला. कारण त्या रिपोर्टमध्ये त्याचा रक्तगट ‘ओ’ पॉजिटीव्ह दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्याचा रक्तगट ‘ए’ पॉजिटीव्ह होता. या विषयी बोलताना त्याने सांगितले कि, लहानपणापासून आतापर्यंत मी अनेकदा रक्त तपासून घेतले आहे. त्यामध्ये त्याचा रक्तगट ‘ए’ पॉजिटीव्ह दाखवण्यात आला आहे, त्यामुळे हे कसे काय झाले? त्यानंतर कुमार पॅथो लॅबने पुन्हा तीन वेळा तपासणी करून त्याचा रक्तगट ‘ओ’ पॉजिटीव्ह सांगितला. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने दुसऱ्या लॅबमध्ये आपला रक्तगट तपासला असता त्याचा रक्तगट ‘ए’ पॉजिटीव्ह दाखवण्यात आला.

दरम्यान, न्यूज़ १८ च्या टीमने याठिकाणी चौकशी केली असता या ठिकाणी या नावाची कोणतीही लॅब नसल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले. अंकुर मेडिकल नावाचा मेडिकलवाला कुमार पॅथो लॅबच्या नावाखाली रक्तगट तपासणी करून रिपोर्ट देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सिविल सर्जन डॉ. जनार्दन शर्मा यांना या घटनेविषयी विचारले असता ते म्हणाले कि, घटना गंभीर आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, याआधी देखील अशा प्रकारच्या तक्रारी याठिकाणो आल्या होत्या. त्यानंतर त्यावर लगेच कारवाई करण्यात आली होती.

मॉब लिचिंग’च्या माध्यमातून होणारे वाढते हल्ले तात्काळ रोखावेत, मुस्लिमांचे धरणे आंदोलन

तबरेज अंसारी मॉब लिंचिंग विरोधात पुण्यात आक्रोश आंदोलन

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

अभिनेत्री कंगना बेघर होती तेव्हा ‘या’ अभिनेत्याने ३ महिने ‘सांभाळले’, वसुल केले १ कोटी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like