दिवसाढवळ्या आरजेडी नेत्याची गोळ्या घालून हत्या 

समस्तीपुर (बिहार) : वृत्तसंस्था – बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे आरजेडी नेते आणि जिल्हा परिषदेचे  माजी उपाध्यक्ष रघुवार राय यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुवर राय हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना अज्ञात मोटार सायकल स्वरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांनतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रघुवार राय यांच्या हत्येनंतर वातावरण तापले असून त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरजेडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी  समस्तीपुर-दरभंगा हाईवेवर रास्ता रोको केले. सदर घटनेचा अधिक तपास कल्याणपुर पोलीस ठाणे करत आहे.