बिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, १४४ कलम लागू

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये गया जिल्ह्यात भयानक गर्मीची लाट उसळली आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. त्याअंतर्गत गयामध्ये सरकारी, निम-सरकारी, तसेच मनेरगा योजनेतून होणारी कामे, मैदानात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांना ११ ते ४ या वेळेत घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पाटणा, औरंगाबाद, नवादा, गया या शहरातील तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सियस दरम्यान आहे. उन्ह्याचा तडाखा कायम असल्याने येथील शाळा २२ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उष्माघाताची सर्वांधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसली आहे. औरंगाबादमध्ये सर्वात जास्त ३०, गया येथे २० आणि नवादा येथे ११ मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी चार लाखांची मदत जाहीर केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त
#YogaDay2019 : आंतरराष्ट्रीय योगा दिनासाठी जागृती मोहीम

#Yoga Day 2019 : ‘पॉवर योगा’ माहित आहे का ? जाणून घ्या फायदे

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

Article_footer_1
Loading...
You might also like