बिहार : मुर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसक गोंधळात JDU नेत्याची हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात मूर्ती विसर्जनाच्या वादादरम्यान हिंसक चकमक उडाली. या घटनेत जेडीयूचा नेत्याची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीच्या विसर्जनावेळी प्रथम दोन पक्षांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीच्या घटनेत जेडीयूचे एरियरी ब्लॉक अध्यक्ष मंटू महतो यांचा मृत्यू झाला, तर तीन लोक गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांना पटणा येथे रेफर करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जेडीयू कामगारांनी पटेल चौक जवळ रास्ता रोको करत जाळपोळ करत आहेत. या हत्येच्या घटनेमुळे संतप्त लोकांनी दुकानही बंद केले आहे. संतप्त लोक एसपी हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंगेरचे डीआयजी मनु महाराज घटनास्थळी पोलिस दलासह तळ ठोकून आहेत.

अनेक आरोपी ताब्यात :
जेडीयूचे आमदार रणधीर कुमार सोनी आमिर खान स्थानिकांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर दोषींवर कारवाईचे आश्वासन देत आहे, संतप्त लोक या प्रकरणात काहीही ऐकायला तयार नाहीत. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती बिघडण्याची शक्यता पाहता परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.